*पंढरपूर सिंहगड मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये बुधवार दिनांक २१ जुन रोजी रोटरी क्लब ऑफ पंढरपूर व एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानतून "आंतरराष्ट्रीय योग दिवस" साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा आहे. योगाचे महत्त्व अशा प्रकारे वाढत आहे की केवळ भारतच नाही तर जगभरातील लोक निरोगी राहण्यासाठी योगाची मदत घेत आहेत. दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जात असल्याचे मत आनंद वाघमारे यांनी यादरम्यान योग प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमात रो. विश्वास आराध्ये यांनी योगाचे महत्व सांगुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक शिक्षक प्रा. चंद्रकांत देशमुख यांनी योगाचे प्रकार सांगुन महत्व सांगितले.
या कार्यक्रमामध्ये प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, रो. किशोर निकते, रो. श्रीरंग बागल आदींसह महाविद्यालयातील शिक्षक व शिकेत्तर कर्मचारीवर्ग सहभागी झाले होते.
या वेळी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यामध्ये सहभागी झाले होते.