सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे “ॲप्टीटयूड प्रशिक्षण” संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी : सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूरमध्ये तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ०१ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत ॲप्टीटयूड प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे संचालन श्री. तुषार पंडीत, आशितोष कुलकर्णी व लक्ष्मण कदम यांनी केले. या प्रशिक्षणामध्ये २३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांमध्ये प्रावीण्य मिळवून देणे हा आहे. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना क्वांटिटेटिव अॅप्टिट्यूड, लॉजिकल रीझनिंग, व्हर्बल अॅबिलिटी, तसेच मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन अशा विविध सत्रांद्वारे सखोल मार्गदर्शन दिले गेले.
हा उपक्रम महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल आणि प्रशिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तयार करण्याचा हे प्रशिक्षण एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे. अप्टिट्यूड कौशल्यात सुधारणा होऊन विद्यार्थी विविध कंपन्यांच्या निवड प्रक्रियेत यशस्वी ठरत आहेत. सॉफ्ट स्किल्समुळे मुलाखतीत आत्मविश्वासाने संवाद साधणे शक्य होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधींसाठी सज्ज करत असून, भविष्यातील करिअरसाठी त्यांना सक्षम बनवत आहेत.
हे प्रशिक्षण यशस्वी होणेसाठी महाविदयालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

