माघ वारीत सिंहगड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचा ‘पोलिस मित्र’ म्हणून उल्लेखनीय सहभाग*

 *माघ वारीत सिंहगड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचा ‘पोलिस मित्र’ म्हणून उल्लेखनीय सहभाग*




पंढरपूर येथील माघ वारी निमित्त एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी (पंढरपूर) येथील राष्ट्रीय सेवा योजना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ‘पोलिस मित्र’ म्हणून सक्रिय सहभाग नोंदविला.

या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी वारकरी भाविकांना मार्गदर्शन करणे, गर्दी नियंत्रणात मदत करणे, स्वच्छता राखणे तसेच प्रशासन व पोलीस यंत्रणेला सहकार्य करणे अशी विविध महत्त्वाची कामे जबाबदारीने पार पाडली. वारीदरम्यान शिस्त, सुरक्षितता व सुव्यवस्था राखण्यात स्वयंसेवकांचा मोलाचा वाटा होता.

हा राष्ट्रीय सेवा योजना कॅम्प विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सेवा भावना तसेच नागरिक कर्तव्याची जाणीव निर्माण करणारा ठरला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सामाजिक कार्याचा अनुभव मिळाला.

या उपक्रमाचे यशस्वी आयोजन सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. सुमित इंगोले तसेच समन्वयक प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. अजित करांडे, प्रा. गुरुराज इनामदार यांनी विशेष मार्गदर्शन केले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासयो अध्यक्ष अविराज साळुंखे, उपाध्यक्ष बिलाल शेख, सचिव राज नागणे, सहसचिव संकेत खडतरे, खजिनदार ओंकार पुजारी, सोशल मीडिया ऑपरेटर विजय पवार तसेच स्वयंसेवक प्रविण नागटिळक, वैभव व्यवहारे, प्रणव जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad