स्वेरीच्या १७ विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीच्या 'गेट' परीक्षेत उत्कृष्ट यश विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला प्राध्यापकांच्या योग्य मार्गदर्शनाची साथ


स्वेरीच्या १७ विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीच्या 'गेट' परीक्षेत उत्कृष्ट यश

विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला प्राध्यापकांच्या योग्य मार्गदर्शनाची साथ 



पंढरपूर- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या ‘गेट’ अर्थात 'ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग' या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील तब्बल १७ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

          संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश मिळविले आहे. या परीक्षेमध्ये संस्थेतील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली असून देशपातळीवर सर्वोच्च रॅंक ६४९ मिळवली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ओम राजू पाटील, सोहम चेतन कुलकर्णी, अनुष्का शहाजी घोडके, आदेश बाळासाहेब कोंढारे, वैष्णवी विलास मस्के, विवेक बंडू पवार, ओंकार बापुसो देशमुख, समर्थ महेश मोटे, आकाश नवनाथ चव्हाण, जय बाळासाहेब जाधवर, तुषार शंकर कर्डुले, भाग्यवान सुनील सायकर, संकेत रावसाहेब मोरे, श्रेयश दशरथ लोकरे, रणजीत कमलाकर धनवडे, आदेश दत्तात्रय देठे व रोहन राजेश ताटीपामल या १७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील कांही विद्यार्थ्यांनी दोन स्वतंत्र पेपर देऊन अधिक यश मिळवले आहे. स्वेरीच्या वतीने घेण्यात येत असलेल्या सातत्यपूर्ण सराव सत्रांमुळे आणि उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कठीण परिश्रमाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. यापूर्वी देखील संस्थेचे अनेक विद्यार्थी 'गेट' परीक्षेतील गुणांच्या आधारे देशातील नामांकित आयआयटी, आयआयएससी आणि एनआयटी यांसारख्या संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाले आहेत तसेच अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या माध्यमातून पीएसयु अर्थात सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये प्रतिष्ठेच्या नोकऱ्या मिळवून संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे. विद्यार्थ्यांना या कठीण परीक्षेची तयारी सोपी जावी यासाठी संस्थेमार्फत वर्षभर विशेष उपक्रम राबवले जातात. यामध्ये गेट, गव्हर्मेंट एक्झाम, कॅट अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध परीक्षांचा समावेश आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांची अॅप्टीटयूड, सॉफ्ट स्किल, कम्युनिकेशन, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत प्रक्रियेसाठी तयारी करून घेतली जाते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. मांडवे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


चौकट:

प्रथम वर्षापासून घेतलेल्या नाईट स्टडी व आयोजित केलेले गेस्ट लेक्चर्स यांचा गेट परीक्षेत यशस्वी होण्यासाठी खूप फायदा झाल्याचे या यशस्वी विद्यार्थ्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.