स्वेरीतर्फे 'मातोश्री' वृद्धाश्रमात फळे वाटप! प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे (सर) यांच्या वाढदिवसानिमित्त 'स्वेरी' परिवाराचा उपक्रम

स्वेरीतर्फे 'मातोश्री' वृद्धाश्रमात फळे वाटप!


प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे (सर) यांच्या वाढदिवसानिमित्त 'स्वेरी' परिवाराचा उपक्रम



पंढरपूर (प्रतिनिधी):

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा 'श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट' या शिक्षणसंस्थेचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे (सर) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, गोपाळपूर येथील 'मातोश्री वृद्धाश्रम' येथे वृद्धांना फळे वाटप करण्यात आली. वाढदिवसाचा कोणताही बडेजाव न करता, केवळ सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डॉ. बी. पी. रोंगे (सर) यांनी ग्रामीण भागातील उच्चशिक्षणाचा दर्जा उंचावण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची 'स्वेरी'ची परंपरा आहे. याच परंपरेचे पालन करत यावर्षी मातोश्री वृद्धाश्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची भेट घेऊन त्यांच्याशी आपुलकीचा संवाद साधण्यात आला व त्यांना फळे वाटप करण्यात आली. याप्रसंगी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी डॉ. रोंगे सर यांना सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक आशीर्वाद दिले. या उपक्रमाप्रसंगी 'स्वेरी संचलित कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ. वृणाल मोरे, डॉ. प्राजक्ता खुळे, 'लोटस इंग्लिश स्कूल'च्या प्राचार्या डॉ. जयश्री भोसले, सहशिक्षक सचिन निकम, संपत लवटे, दयानंद जाधव, शिक्षकेतर कर्मचारी संजय फुले यांच्यासह वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक धनंजय राक्षे आणि सेवकवर्ग उपस्थित होते. वाढदिवसाच्या निमित्ताने लाखो रुपये खर्चून बॅनरबाजी, फटाके याला फाटा देऊन फळे वाटप करून सामाजिक उपक्रम करणाऱ्या स्वेरीचे या निमित्ताने सर्वत्र कौतुक होत आहे. 'स्वेरी' परिवाराने जपलेल्या या सामाजिक बांधिलकीचे आणि उपक्रमाचे पंढरपूर शहर आणि पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.