शेतकऱ्यांच्या विजबाबतच्या विविध प्रश्नांना आमदार आवताडे यांनी फोडली वाचा. जिल्हाधिकाऱ्यांकडून आमदार समाधान आवताडे यांच्या मागणीची दखल

 शेतकऱ्यांच्या विजबाबतच्या विविध प्रश्नांना आमदार आवताडे यांनी फोडली वाचा.


जिल्हाधिकाऱ्यांकडून आमदार समाधान आवताडे यांच्या मागणीची दखल



पंढरपूर/प्रतिनिधी


पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांच्या विविध वीजविषयक प्रश्नांवर आमदार समाधान आवताडे यांनी आक्रमक भूमिका घेतली. पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून त्यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मांडत संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच विभागीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याच्या समस्यांकडे आमदार आवताडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.


वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना गावठाणाप्रमाणे वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, नवीन डीपी बसविताना त्याची योग्य प्रकारे तपासणी करूनच कार्यान्वित करावा, अशी सूचना केली. फिल्टर युनिटवरून डीपी बसविल्यानंतर त्याला लागू असलेल्या एक वर्षाच्या वारंटी कालावधीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

एनएससी योजनेअंतर्गत घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांना वीज जोडणी उपलब्ध करून देताना शेतकरी व नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांना आवश्यक सेवा विनाशुल्क उपलब्ध करून द्याव्यात, अशी भूमिका आमदार आवताडे यांनी मांडली.


सध्या शेतीपंपांसाठी अपुरा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी शेतीपंपांना दररोज आठ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

आमदार आवताडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित मूलभूत प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा निर्माण झाली असून शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.