कॉरिडॉर प्रकल्पाबाबत भाजप नगरसेवकांचा आक्षेप; पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष...
विरोधाची भूमिका समोर; पालकमंत्री काय निर्णय घेणार?
भाजपला घरचा आहेर!
आमदार अवताडे परिचारक काय भूमिका घेणार...????
कॉरिडॉरला भाजप नगरसेवकांचाच आक्षेप ; पक्षाच्या भूमिकेवरच उपस्थित झाले सवाल
पंढरपूर : कॉरिडॉरच्या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपच्या नगरसेवकांनीच कॉरिडॉरला विरोध केल्याने भाजपला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. पक्षाची भूमिका आणि स्थानिक नगरसेवकांची भूमिका यामध्येच विसंगती निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे.
कॉरिडॉर प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांनी विरोधाची भूमिका घेतल्याने पक्ष नेतृत्वासमोरच मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे विकासाच्या नावाखाली प्रकल्पाचे समर्थन आणि दुसरीकडे पक्षाच्या नगरसेवकांकडूनच त्याला विरोध, अशी दुहेरी भूमिका का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
जनतेच्या भावनांचा विचार करून नगरसेवकांनी विरोध केला असेल, तर पक्ष नेतृत्वानेही या भूमिकेची दखल घेण्याची गरज आहे. स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी जर प्रकल्पाला विरोध करत असतील, तर त्यामागील कारणे स्पष्ट करण्याची जबाबदारी भाजपवर आली आहे.
कॉरिडॉरच्या मुद्द्यावरून भाजपमध्येच मतभेद असल्याचे चित्र निर्माण झाल्याने आगामी काळात हा विषय अधिक पेटण्याची शक्यता आहे. भाजपच्या नगरसेवकांचाच विरोध म्हणजे पक्षाला पक्षातूनच मिळालेला इशारा मानायचा का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कॉरिडॉरच्या निर्णयावर जनतेचा आवाज महत्त्वाचा की पक्षाची भूमिका? याचे उत्तर आता भाजप नेतृत्वाने द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

