सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभाग तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागात शिक्षक दिन उत्साहात साजरा

 सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभाग तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागात शिक्षक दिन उत्साहात साजरा



कोर्टी, पंढरपूर : सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभाग तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागाच्या वतीने शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले.


भारताचे माजी राष्ट्रपती, महान शिक्षणतज्ज्ञ व तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली.


कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करून शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्त्व विकासाला मिळणाऱ्या प्रेरणेचे महत्त्व अधोरेखित केले.


कार्यक्रमास कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागाचे विभागप्रमुख डॉ. नामदेव सावंत यांच्यासह दोन्ही विभागांतील शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.


दोन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे केलेल्या आयोजनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. शिक्षकांच्या ज्ञान, मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होते, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.


शिक्षक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे दोन्ही विभागांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.