शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नागेश फाटे यांची नियुक्ती
पंढरपूर / प्रतिनिधी
शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नागेश फाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकतेच संस्थेच्या मार्गदर्शक खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कोयनारत्न राजाराम बुवा शेलार, व्यवस्थापक चित्रपट दिग्दर्शक विनोद शिंदे, मुंबई उपनगर अध्यक्ष निर्माता निलेश गुंडाळे, मंगेश पाटील या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नागेश फाटे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
संस्थेच्या कार्यकारिणीने सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक चळवळीप्रती असलेली सकारात्मक भूमिका, कार्यक्षमता आणि दीर्घ अनुभव यांचा विचार करून नागेश फाटे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे संस्थेच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात सोलापूर जिल्ह्यात सांस्कृतिक चळवळी अधिक प्रभावीपणे राबविणे, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवोदित कलावंत व प्रतिभावंतांना प्रोत्साहन देणे तसेच संस्थेची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नागेश फाटे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्य केले असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करत संस्थेने त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावनाानुसार, नागेश फाटे यांच्या नेतृत्वामुळे शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कार्याला सोलापूर जिल्ह्यात नवी दिशा मिळेल. संस्थेची मूल्ये, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जपत ते निष्ठेने कार्य करतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
नियुक्तीनंतर नागेश फाटे यांच्यावर विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे नियोजन व अंमलबजावणीची जबाबदारी राहणार असून, जिल्हाभरातील कलाकार, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना एकत्रित करून संस्थेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात आले.

