सिंहगड महाविद्यालयात ‘डेटा प्रीप्रोसेसिंग अँड व्हिज्युअलायझेशन फॉर एआयएमएल ॲप्लिकेशन’ विषयावर अतिथी व्याख्यान संपन्न

 *सिंहगड महाविद्यालयात ‘डेटा प्रीप्रोसेसिंग अँड व्हिज्युअलायझेशन फॉर एआयएमएल ॲप्लिकेशन’ विषयावर अतिथी व्याख्यान संपन्न*




एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी (पंढरपूर) येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभाग व आयईटीई विद्यार्थी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २८ जानेवारी २०२६ रोजी “डेटा प्रीप्रोसेसिंग अँड व्हिज्युअलायझेशन फॉर एआयएमएल ॲप्लिकेशन” या विषयावर मार्गदर्शक अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या व्याख्यानासाठी रॉकवेल ऑटोमेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे येथील तज्ज्ञ श्री. पांडुरंग ढोपे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग आधारित प्रणालींच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डेटाची गुणवत्ता, अचूकता व सुसंगतता किती महत्त्वाची आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

वक्त्यांनी डेटा प्रीप्रोसेसिंगच्या टप्प्यांमध्ये डेटा संकलन, डेटा स्वच्छता, नॉईज काढून टाकणे, अपूर्ण व विसंगत माहितीचे व्यवस्थापन, फीचर सिलेक्शन व नॉर्मलायझेशन यांचा सविस्तर आढावा घेतला. योग्य पद्धतीने प्रीप्रोसेस केलेला डेटा एआय-एमएल मॉडेलची अचूकता, कार्यक्षमता व विश्वासार्हता लक्षणीयरीत्या वाढवतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच डेटा व्हिज्युअलायझेशन या घटकाचे महत्त्व सांगताना आलेख, तक्ते, चार्ट्स व डॅशबोर्ड्सच्या साहाय्याने गुंतागुंतीचा डेटा सोप्या पद्धतीने समजून घेता येतो, निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावी होते आणि व्यावसायिक समस्या लवकर ओळखता येतात, असे औद्योगिक उदाहरणांसह त्यांनी मांडले. उत्पादन, ऑटोमेशन, हेल्थकेअर व स्मार्ट सिस्टीम्समधील एआय-एमएल आधारित अनुप्रयोगांची उदाहरणेही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर सादर केली.

याशिवाय एआय-एमएल क्षेत्रातील संशोधनाच्या संधी, औद्योगिक अपेक्षा तसेच करिअरसाठी आवश्यक तांत्रिक व विश्लेषणात्मक कौशल्यांबाबत विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन देण्यात आले. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना वक्त्यांनी समर्पक व सविस्तर उत्तरे देत त्यांचे शंका निरसन केले.

या व्याख्यानाला द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे आयोजन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील सर्व प्राध्यापकांच्या सहकार्याने करण्यात आले असून, प्रा. वैभव गोडसे व प्रा. माधवराव नाईकनवरे यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून विशेष योगदान दिले.

हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जे. करांडे व विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad