सिंहगडच्या वैष्णवी पाटील हिची MNRE च्या राष्ट्रीय संशोधन इंटर्नशिपसाठी निवड नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात देशपातळीवरील संधी

 सिंहगडच्या वैष्णवी पाटील हिची MNRE च्या राष्ट्रीय संशोधन इंटर्नशिपसाठी निवड

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात देशपातळीवरील संधी



पंढरपूर | २०२५ : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी पाटील हिची भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या National Renewable Energy Internship Programme साठी देशपातळीवर निवड झाली आहे. ही निवड सिंहगड महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरणारी आहे.

ही इंटर्नशिप सहा महिन्यांची असून या कालावधीत वैष्णवीला दरमहा रु.१५,०००/- मानधन मिळणार आहे. इंटर्नशिप दरम्यान तिला भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य राष्ट्रीय प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार असून संशोधन, धोरण आखणी आणि तांत्रिक उपक्रमांचा सखोल अनुभव घेता येणार आहे. यामुळे देशाच्या स्वच्छ, शाश्वत व हरित ऊर्जा मोहिमेत सक्रिय योगदान देण्याची संधी तिला प्राप्त होणार आहे.

यशस्वी प्रशिक्षणानंतर MNRE, भारत सरकारचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून हे प्रमाणपत्र वैष्णवीच्या भावी संशोधन व व्यावसायिक वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

ही कामगिरी वैष्णवीच्या कठोर परिश्रम, सातत्य, संशोधनाभिमुख दृष्टिकोन तसेच यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील दर्जेदार शैक्षणिक वातावरणाचे उत्तम प्रतीक आहे.

या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, पब्लिकेशन डीन डॉ. संपत देशमुख आणि यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातर्फे कु. वैष्णवी पाटील हिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून तिच्या उज्ज्वल संशोधन कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. हे यश सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याचा, संशोधननिष्ठेचा आणि नवोन्मेषी विचारांचा सशक्त प्रत्यय देणारे ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad