कर्मयोगीतील “डिपेक्स २०२६” मधून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना.
सोलापूर विभागीय आयडिया प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात संपन्न.
अ. भा. वि. प. तसेच सृजन ट्रस्ट व श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या डिपेक्स २०२६ ची आयडिया प्रेझेंटेशन सोलापूर विभाग स्तरीय स्पर्धा कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण विचारांना व्यासपीठ देणार्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा उपस्थित होते.
यावेळी प्र-कुलगुरू लक्ष्मीकांत दामा यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डिपेक्ससारख्या उपक्रमातून देशाला भावी संशोधक तसेच उद्योगक मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. केवळ प्रयत्न करून नाही तर प्रत्यक्ष कृती केल्यावरच यश मिळते असा यशाचा कानमंत्र त्यांनी यावेळी दिला.
सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी महाविद्यालयाची ओळख करून देऊन सहभागी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यानी आपल्यातील कौशल्याचा व तंत्राद्यानाचा वापर हा दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी करावा असा संदेश ही त्यांनी यावेळी दिला. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यानी कृत्रिम बुद्धिमत्ता, मोबिलिटी, वैद्यकीय तंत्रज्ञान, संरक्षण आणि सायबर सुरक्षा, औद्योगिक ऑटोमेशन, कृषि तंत्रज्ञान अश्या विविध क्षेत्रातील कल्पनांचे सादरीकरण केले.
यावेळी अ.भा.वि.प. चे जिल्हा संयोजक पवन भोसले यांनी अ.भा.वि.प. तसेच डीपेक्स बद्दल ची संपूर्ण माहिती दिली. या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील ४० मान्यवरांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेसाठी सुमारे २०० ग्रुप व १००० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. या स्पर्धेची राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धा फेरी ५ ते ८ मार्च २०२६ रोजी एम आय टी कॉलेज छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न होणार आहे.
सदर स्पर्धेसाठी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री रोहन परिचारक यांनी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजीस्ट्रार जी डी वाळके, उप पप्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, सृजन ट्रस्ट चे आयुष पारिख, अ. भ. वी. प. चे आदित्य कदम, कर्मयोगी शिक्षण समूहातील विविध महावियालयाचे प्राचार्य, डिपेक्स स्पर्धेचे महाविद्यालयाचे संयोजक डॉ अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा.राहुल पांचाळ उपस्थित होते.
सदर ची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख डॉ. एस एम लंबे, डॉ. एस व्ही एकलारकर, डॉ अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले तसेच सर्व प्राध्यापक व विविध विभागाचे संयोजक यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
अ.भा.वि.प. चे यश शेळके यांनी आभार मानले. तर समीक्षा घायाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रज्ञा मुळे यांनी वंदे मातरम हे गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.

