स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल आंत्रप्रन्युअरशिप चॅलेंज’ मध्ये यश १४ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग


स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल आंत्रप्रन्युअरशिप चॅलेंज’ मध्ये यश

१४ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग



पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) च्या स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘ई-सेल स्टुडन्ट टीम’ चे विद्यार्थी ‘नॅशनल आंत्रप्रन्युअरशिप चॅलेंज’ मध्ये सहभागी झाले होते. आयआयटी बॉम्बेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील यशामुळे त्या सहभागी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

        स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम. एम. पवार यांच्या सहकार्याने या विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ. हर्षवर्धन रोंगे यांचे मार्गदर्शन लाभले. स्वेरीच्या या विद्यार्थ्यांचे यश हे विशेष असे आहे कारण गोपाळपूर सारख्या ग्रामीण भागात असणाऱ्या स्वेरीतून शिक्षण घेऊन शहरी विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा करत असूनही त्यांनी हे यश संपादन केले आहे. खेळ असो व स्पर्धा, स्वेरीचे विद्यार्थी हे परिश्रम करतातच, हे ‘नॅशनल आंत्रप्रनरशिप चॅलेंज’ या स्पर्धेत मिळालेल्या यशावरून समजते. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेणाऱ्या समिक्षा खटावकर, समीक्षा गटकळ, सानिका बागल, शुभांगी सगर, प्रतीक्षा चौधरी, नूपुर अचलारे, वैष्णवी पाटील, श्रद्धा सलवदे, तृप्ती बुरगुटे, जय गाडेकर, फैयाज तांबोळी, अथर्व काकडे, दिग्विजय बुरा, ओंकार येलगोंडे व भूषण बागल, अशा १४ विद्यार्थ्यांनी ‘नॅशनल आंत्रप्रन्युअरशिप चॅलेंज’मध्ये सहभाग घेतला होता. सांघिक कामगिरी करत असताना या विद्यार्थ्यांनी प्राथमिक फेरीमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. त्यांनी दि.१० डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान आयआयटी मुंबई येथे झालेल्या अंतिम फेरीत सहभाग घेतला. स्पर्धेत संपूर्ण भारतातील सहभागी झालेल्या ४ हजारांहून अधिक असलेल्या महाविद्यालयांमध्ये त्यांनी अंतिम फेरी मध्ये ३६ वा क्रमांक मिळवला आहे. अशा स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढीस लागतो आणि त्यामुळे चांगले करिअर करण्यासाठी हातभार लागतो. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडते. स्वेरीमध्ये संशोधनात्मक कार्यशाळा होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळते यासाठी स्वेरीतील ई-सेल टिम परिश्रम घेत आहे. या यशामुळे स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष हनीफ शेख, विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, अभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम. एम. पवार, संशोधन अधिष्ठाता, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad