*सिंहगड महाविद्यालयामध्ये यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामध्ये औद्योगिक क्षेत्रातील विद्युत सुरक्षितेवर तज्ञांचे मार्गदर्शन*
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या वतीने तृतीय वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी “औद्योगिक क्षेत्रातील विद्युत सुरक्षितंता ” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी टीजीव्ही इंडस्ट्रीज, कुर्नूल (आंध्र प्रदेश) येथील श्री. वेंकटा चलपती बाथला
( ब्राइन प्लांटचे विभागप्रमुख तसेच यांत्रिकी, तेल व फॅटी ॲसिड्स विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक, सीएमएस प्रकल्प ) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात त्यांनी उद्योगांमधील विद्युत सुरक्षिततेचे नियम, संभाव्य धोके ओळखण्याच्या पद्धती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, लॉकआउट–टॅगआउट प्रणाली, सुरक्षित देखभाल प्रक्रिया तसेच प्रत्यक्ष औद्योगिक उदाहरणांद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. औद्योगिक क्षेत्रात सुरक्षितता संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करत अपघात टाळण्यासाठी आवश्यक दक्षता व नियमांचे पालन करण्याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक केले.
या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध प्रश्न विचारून त्यांनी आपल्या शंकांचे निरसन केले तसेच औद्योगिक कार्यपद्धतींचे प्रत्यक्ष ज्ञान आत्मसात केले.
हा कार्यक्रम यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी व प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांच्या प्रेरणा व पाठबळामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
हे गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरले असून औद्योगिक सुरक्षिततेविषयीची जाणीव वृद्धिंगत करण्यासोबतच त्यांच्या व्यावसायिक कौशल्यांमध्ये आणि उद्योगसुसंगत तयारीत लक्षणीय वाढ करण्यास मोलाचे ठरले.

