अभिजीत पाटील यांनी जपली परिवाराची संस्कृती* *आरोप प्रत्यारोप अन् काच फोडूनही विठ्ठलच्या वतीने केला नेत्यांचा सन्मान*

 *अभिजीत पाटील यांनी जपली परिवाराची संस्कृती*


*आरोप प्रत्यारोप अन् काच फोडूनही विठ्ठलच्या वतीने केला नेत्यांचा सन्मान*



प्रतिनीधी पंढरपूर /- 


सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली .यामध्ये काळे गटाला यश प्राप्त झाल्यानंतर कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांच्या पुतळ्यास श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे,मंगळवारी सहकार शिरोमणी 

चे चेअरमन कल्याणराव काळे ,भगीरथ भालके, युवराज पाटील, समाधान काळे, गणेश पाटील यांनी येऊन कारखाना स्थळावर येऊन अभिवादन केले. यावेळी हीच परंपरा आणि संस्कृती जपत विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वतीने यथोचित सन्मान करून आपल्या परिवाराची संस्कृती जपली आहे.


ही निवडणूक विठ्ठल परिवार अंतर्गत होती. या पार पडलेल्या निवडणुकीत एकमेकावर आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाले. एवढेच नव्हे तर विजयी झालेल्या काळे गटाच्या समर्थक यांनी निवडणुकीतील मतमोजणी दिवशी चेअरमन अभिजीत पाटील यांच्या गाडीची काच फोडली होती. याबाबतचा कोणताही रोष मनात न बाळगता आपल्या परिवारातील संस्कृतीला कुठेही डाग न लागता, अभिजीत पाटील यांनी या आलेल्या विठ्ठल परिवारातील नेत्यांचा नेत्यांचा सत्कार केला. हीच राजकारणाची परंपरा आणि सुसंस्कृतपणा अभिजीत पाटील यांनी जपलेला आहे.


चेअरमन अभिजीत पाटील बाहेरगावी असल्याने ते स्वतः उपस्थित नव्हते. मात्र त्यांच्या आदेशाने हा सन्मान करण्यात आला आहे. हा सत्कार संचालक मंडळ व कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्या हस्ते करण्यात आले. 


यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad