*पंढरपूर सिंहगड मध्ये व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस. के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयामध्ये व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्रा. अनिल निकम यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी 'एम्पलोयबीटी मेंटॉरशिप प्रोग्राम अर्थात व्हॅल्यू एडिशन प्रोग्रॅम' आयोजित करण्यात आला होता. या प्रोग्राम मध्ये सी. यु. सक्सेसड चे प्रा. श्रीकांत सुंदरगिरी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, कॉन्फिडन्स बिल्डिंग, अशा अनेक कौशल्य आधारित ट्रेनिंग देण्यात आले जे ट्रेनिंग विद्यार्थ्यांना त्यांच्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्गात शिकत असतानाच भरगच्च पगाराची नोकरी मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल.
हा प्रोग्रॅम प्रति बॅच पाच दिवस असा ३० दिवस कार्यक्रम झाला. प्रथम वर्ष अभियांत्रिकी मधील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम मध्ये सहभाग नोंदविला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागामधील प्रा. डॉ. दीपक गानमोटे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.