स्वेरीच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल या विभागांतील ५४ विद्यार्थ्यांची ‘जय हिंद इंडस्ट्रीज प्रा. लि.’ या कंपनीत निवड


स्वेरीच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल या विभागांतील ५४ विद्यार्थ्यांची ‘जय हिंद इंडस्ट्रीज प्रा. लि.’ या कंपनीत निवड



पंढरपूरः फोर्स मोटर्स ग्रुप्सच्या ‘जय हिंद इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीतून गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी (डिप्लोमा) महाविद्यालयातील तब्बल ५४ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.' अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

       स्वेरीच्या पदवी अभियांत्रिकी कॉलेज प्रमाणेच डिप्लोमा कॉलेज देखील प्लेसमेंट मध्ये आकाशाला गवसणी घालत आहे. पुणे येथील फोर्स मोटर्स ग्रुपच्या 'जयहिंद इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड.’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून डिप्लोमाच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणारे आनंद उत्तम सपकाळ, स्वप्नील श्रीहरी माळी, रोहित भिमराव काळे, प्रतीक भगवान सागर, अनिकेत राजेंद्र शिरसट, संग्राम आनंदराव जगदाळे, समाधान नागनाथ खांडेकर, समर्थ पांडुरंग चव्हाण, अर्जुन चिमा नायकु व सिद्राम चंद्रकांत बिराजदार या १० विद्यार्थ्यांची तर डिप्लोमाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील महेश आप्पासो बुरंगळे, प्रणव सुभाष बागल, माऊली संजय गोरे, शुभम राजेंद्र रोंगे, विश्वजीत संतोष शेळके, अक्षय नागेश लोकरे, आतिक इम्तियाज मणियार, सुरज मोहन उबाळे, यश संतोष कोकाटे, अनिकेत कैलास काटकर, रोहन रावसाहेब कोडग, अविनाश राजकुमार माने, शंतनु विठ्ठल माने, प्रशांत धर्मराज घोडके, अक्षय करण नारायणकर, अक्षय वसंत देवकर, प्रथमेश राजेंद्र खोटे, हर्षद रवींद्र खुर्द, प्रथमेश श्रीकांत लव्हेकर, ओंकार नागनाथ आगळे, प्रतीक दीपक एडवे, संदेश दत्तात्रय शिंदे, सौरभ सुधीर कुलकर्णी, सुरज जमीर तांबोळी, अनिरुद्ध शरद बुरगुटे, प्रणव गोरख घाडगे, ओंकार रणजीत पवार, अमर दत्तात्रय बाबर, अथर्व मिलिंद बोचरे, रोहन शहाजी चवरे, शुभम बाजीराव गायकवाड, अक्षय धुळा कोळेकर, मयूर नवनाथ सुरवसे, आदित्य हरिश्चंद्र शेळके, प्रमोद विठ्ठल कडलासकर, सत्यम नितीन चव्हाण, संग्राम महादेव रणदिवे, विघ्नेश अरविंद सुरवसे, सार्थक संदीप जोशी, निखिल सुनील सरवदे, हर्षवर्धन दुशांत कुलकर्णी, सत्यजित साहेबराव कदम, विपुल हनुमंत ढाणे व ओंकार चंदू जाडकर हे ४४ विद्यार्थी असे मिळून एकूण ५४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरी अभियांत्रिकीमधून प्लेसमेंटच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. स्वेरीचे विद्यार्थी आज विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यात आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. ‘स्वेरी’ मधून विविध कंपन्यात प्लेस होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसून येते. विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत स्वतंत्रपणे कुशल प्रशिक्षकांद्वारे एप्टीट्युड, कम्युनिकेशन स्कील, टेक्निकल स्कील, विविध सॉफ्टवेअर्स, मॉक इंटरव्युव्ह यांचे प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षांचे उत्कृष्ट निकाल, संशोधने, मानांकने, इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व मोठमोठ्या कंपन्यांना हवे तसे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून उत्कृष्ट मार्गदर्शन केले जाते. या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. स्वेरीच्या पदवी अभियांत्रिकीच्या पावलावर पाऊल टाकत डिप्लोमाने देखील प्लेसमेंट मध्ये उत्तुंग झेप घेतली आहे. सदर विद्यार्थ्यांना डिप्लोमाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.गणेश धारेकर व संबंधित विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनिफ शेख तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम. पवार, प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी ‘जयहिंद इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad