स्वेरीमध्ये ‘नॅशनल एज्युकेशन डे’ उत्साहात साजरा
पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ तथा ‘नॅशनल एज्युकेशन डे’ उत्साहात साजरा करण्यात आला.
देशात सर्वत्र दि.११ नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ साजरा केला जातो. भारताचे पहिले शिक्षणमंत्री आणि भारताच्या विकासासाठी दूरदृष्टी असलेले थोर नेते मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीच्या निमित्ताने देशभरात ‘नॅशनल एज्युकेशन डे’ चे आयोजन केले जाते. या राष्ट्रीय उपक्रमाच्या अनुषंगाने संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात स्वेरीच्या ‘इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल’ (आयआयसी), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन (इसा) आणि लाईटनींग लेजंडस् स्टुडंट क्लब (एलएलएससी) यांच्या संयुक्त विद्यमाने या ‘नॅशनल एज्युकेशन डे’ च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेरणादायी मार्गदर्शन करणारे वक्ते प्रा. इसाक मुजावर हे होते. दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.सागर कवडे यांनी ‘राष्ट्रीय शिक्षण दिना’चे महत्त्व स्पष्ट केले प्रा.मुजावर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, ‘देश निर्मितीत शिक्षणाची भूमिका ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवते. याद्वारे बौद्धिक कौशल्य, प्रेरणा विकसित करणे, कौशल्य विकास व नवोन्मेषाचें महत्व, शैक्षणिक ज्ञान व वास्तविक जीवनात अनुप्रयोग यामधील दरी कमी करणे या महत्वाच्या मुद्द्यावर भर दिला. एकूणच प्रा.मुजावर यांनी बदलत्या जगात शिक्षण, नवोन्मेष, शिस्त आणि वैयक्तिक विकासाचे महत्त्व पटवून सांगितले. या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन प्रा. सागर कवडे यांनी केले तर स्वेरीच्या आयआयसीचे अध्यक्ष डॉ. दिग्विजय रोंगे यांनी आभार मानले.

