रेडणी येथे कृषी सल्ला केंद्राचा उद्घाटन समारंभ
इंदापूर प्रतिनिधी - इंदापूर तालुक्यातील रेडणी येथे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संस्थेच्या महत्त्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या रत्नाई कृषि महाविद्यालय अकलूज येथील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या कृषि मित्रांकडून ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने येथे कृषि कार्यानुभव कार्यक्रम पुढील सहा महिने राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत कृषिदुतांनी गावातील शेतकरी बांधवांना गुलाबाची फुले देऊन सन्मानित केले. आणि शेतकरी बांधवांना पिकाच्या लागवडी पासून ते काढणीपर्यंत थोडक्यात माहिती दिली व शेतीमधील झालेले नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल थोडक्यात माहिती दिली . यावेळी रेडणी गावचे सरपंच मा. श्रीमती हिराबाई खाडे, ग्रामविकास अधिकारी मा. श्री.महेश म्हेत्रे, कृषी सहाय्यक अधिकारी मा.श्री.प्रदीप माने, तलाठी मा.श्री.योगेश बाबर, पोलिस पाटील मा.श्री.महेंद्र पडळकर आणी समस्त शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत रणजित कोडलकर ,श्रीधर रावळे, भार्गव पानकडे,पृथ्वीराज आवताडे,अदित्य बनसोडे, आयान नदाफ,कृण्णा गुळवे,तेजस निल्लावार, विराज शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर.जी. नलावडे, प्रा.एस.एम. एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक), प्रा. एम. एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले.

