*निमगांव केतकी येथे स्थानिक लोकांकडून बियाणे संकलन - कृषी दुतांचा उपक्रम*
रत्नाई कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत गावातील शेतकऱ्यांकडून बियाणे संकलन केले. तसेस स्थानिक वाण गोळा केले. पारंपारिक वाणाचे संवर्धन व जतन यासाठी शेतकऱ्यांची संवाद साधून पिकांच्या बियाण्यांची त्यांची वैशिष्ट्ये व गवळीची लागवडीची परंपरागत पद्धती यांची माहिती नोंदवली या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, मुग, डाळी तसेच भाजीपाला यांचे स्थानिक वाण गोळा केले. स्थानीय पातळीवर जतन झालेली ही बियाणे जैवविविधतेस उपयुक्त ठरणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या प्रसंगी गावकऱ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत विद्यार्थ्यांना मौल्यवान माहिती उपलब्ध करून दिली. पुढील संशोधन व संवर्धनासाठी हे महत्वाचे ठरणार आहे. यावेळी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत स्वप्निल नाईकनवरे, प्रज्योत शिरढोणे, रोहित मगर, विवेक घुले, शेखर टापरे, श्रीराम फडतरे, प्रथमेश दुरगुडे, शिवराज निंबाळकर, गुरुदत्त भोसले उपस्थित होते. यावेळी संवाद साधून विविध पिकांच्या बियाण्यांची माहिती घेतली. या कार्यक्रमासाठी रत्नाई कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस एम. एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक), प्रा. एम. एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी), विषयतज्ञ प्रा. ए. बी. तमनर यांचे मार्गदर्शन लाभले.

