मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष अन् नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा शहरातील विविध मार्गांवरून पदयात्रा रॅलीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला.
मंगळवेढा/प्रतिनिधी
आज मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघाचे आमदार लोकनेते आदरणीय श्री.समाधानदादा आवताडे साहेब* यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये *भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुती* *नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मा.प्रा.सौ. सुप्रियाताई अजितआप्पा जगताप तसेच प्रभाग क्रमांक ५, ६ आणि ७ नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा शहरातील विविध मार्गांवरून पदयात्रा रॅलीच्या माध्यमातून नागरिक व माता-भगिनींशी संवाद साधला.
या संवादादरम्यान स्थानिक पातळीवरील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था आणि सार्वजनिक सोयी-सुविधांच्या उन्नतीसंबंधी नागरिकांनी मांडलेले मुद्दे ऐकून घेण्यात आले.
मंगळवेढा नागरी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची भूमिका यावेळी आमदार महोदय सर्व उमेदवार यांच्या रूपाने मांडण्यात आली.
यावेळी अनेक जेष्ठ मान्यवर सहकारी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार बांधव, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते...!✌️

