चिंचोली माळी येथील सर्वांगीण विकास, भ्रष्टाचार चौकशी,महाडिबीटी अनुदानासाठी १७ डिसेंबर रोजी अमरण उपोषण - रोहन गलांडे पाटील
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील अतिक्रमणे उर्वरित अतिक्रमण काढून छत्रपती संभाजी महाराज चौक ते श्री संत नामदेव महाराज मंदिर पर्यंत रस्ता व नालीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे तसेच चिंचोली माळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रला २०१५ ते २०२५ पर्यंत जुन्या व नव्या इमारतींच्या बांधकामासाठी, पुनर्विकासासाठी कीती निधी आला व कीती खर्च केला यांची माहिती देण्यात यावी तसेच चिंचोली माळी येथील ग्रामपंचायत हद्दीत येणारे अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे तसेच चिंचोली माळी येथील गायरान परीसरातील सौरऊर्जा प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे तसेच चिंचोली माळी ते हादगाव रोडचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे तसेच महाडीबीटी अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना तात्काळ शेतकऱ्यांना द्या तसेच मौजे चिंचोली माळी ता. केज.जि.बीड येथिल उपसरपंच यांनी पाणी पुरवठा विहरीवरून स्वताची व नातेवाईकाची जमीन भिजवण्यास पाणी वापर केला असल्या बाबत चौकशी करून आजपर्यंत शासकीय योजनेचा गैरवापर केल्या प्रकरणी दंडात्मककारवाई करण्यात यावी,केज तालुक्यातील विहीर व गायगोठा, घरकुलाचे हप्त्ये तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे, मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांची सत्या करणारा एक आरोपी आणखी अटक झाली नाही त्याला अटक करण्यात यावी व सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.चिंचोली माळी येथील कर्मवीर विद्यालयाची २००५ ते २०२५ पर्यंत सखोल चौकशी करण्यात यावी , पटसंख्ये पेक्षा जास्त शिक्षक असणाऱ्या शिक्षकांना निलंबित करण्यात यावे, कर्मवीर विद्यालय १० बोर्ड परीक्ष केंद्र आहे परीक्षा केंद्रावर सुविधा उपलब्ध असतात त्या नियमानुसार आहेत का याची चौकशी करण्यात यावी सुविधा नसतील परीक्षा केंद्र रद्द करण्यात यावे,संस्थे मध्ये एसटी चा व्यक्ती भरला आहे त्याची जात वैधता भोगस आहे का त्यांची चौकशी करण्यात यावी,तसेच कर्मवीर विद्यालयातील सर्व शिक्षकांची शैक्षणिक गुणवत्ता तपासणी करण्यात यावी ,शिक्षक भरती करण्यासाठी शिक्षकांकडून संस्थाचालकांनी अंदाजित आठ नऊ लाख रुपये घेतले आहे व दंडमशाहीने शिक्षकांन कडुन संस्थाचालकाने तुम्ही मला पैसे दिले नाहीत असे बॅन्ड प्रमाणपत्र लीहुन घेतले आहेत
असे समजले जाते तरी यांची चौकशी प्रशासनाने करण्यात यावी जर असे झाले असेल तर संस्थाचालक यांच्यावर कारवाई करण्यात अशा मागण्यासाठी १७ /१२/२०२५ रोजी श्री संत नामदेव महाराज सभागृह येथे अन्नत्याग उपोषणाला बसणार आहे तरी मला उपोषणा दरम्यान काही झाले माझे बरेवाईट झाले तर प्रशासन केज तहसीलदार, जिल्हाधिकारी साहेब लोकप्रतिनिधी व वरील विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील अशी निवेदनाद्वारे विनंती करण्यात येत आहे तरी माझ्या अन्नत्याग उपोषणाची दखल प्रशासनाने घ्यावी ही नंम्र विनंती असे निवेदनाद्वारे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.

