एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे इंटेलिजंट कम्प्युटिंग अँड व्हिजन टेक्नॉलॉजीज (ICICVT-2025) आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन :

 एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे इंटेलिजंट कम्प्युटिंग अँड व्हिजन टेक्नॉलॉजीज (ICICVT-2025) आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन :

(अभियांत्रिकी संशोधन क्षेत्रात सिंहगड अग्रेसर - श्रीलंका येथील युनिव्हर्सिटी ऑफ रुहुणा येथील प्रा. डॉ. के. एम. एस. वाय. कोनारा )

(संशोधनातून भारताला विकसित देश बनवा- डॉ. परिक्षित महाल्ले, पुणे )



एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर येथे इंटेलिजंट कम्प्युटिंग अँड व्हिजन टेक्नॉलॉजीज (ICICVT-2025) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ही परिषद कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्कूल ऑफ कॉम्प्युटेशनल सायन्सेस, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आली. डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी परिषदेची रूपरेषा मांडून कार्यक्रमास प्रारंभ केला . परिषदेचे समन्वयक डॉ. आर. एस. मेंते यांनी पी.एम. उषा स्कीम, आधुनिक तंत्रज्ञान व दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाबाबत सविस्तर माहिती दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांनी परिषदेची उद्दिष्टे स्पष्ट करताना सांगीतले की, आंतरराष्ट्रीय परिषद बुद्धिमान संगणन आणि दृश्य तंत्रज्ञान (ICICVT)-2025, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या सहकार्याने होणार असून, सैद्धांतिक आणि अनुप्रयुक्त एआय संशोधन तसेच संशोधक आणि व्यावसायिकांमधील बौद्धिक आदान-प्रदान प्रोत्साहित करते. तांत्रिक कार्यक्रमात मोलाचे, मूळ संशोधन आणि व्यावहारिक तंत्रांचा समावेश आहे. चर्चासत्र आणि आमंत्रित सादरीकरणे जगभरातील एआयच्या विकासावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या सामाजिक, तात्त्विक आणि आर्थिक मुद्द्यांची ओळख करुन देतात. अशीही माहिती त्यांनी दिली.  

या आंतरराष्ट्रीय परिषदेत आलेले प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते प्रा. डॉ. के. एम. एस. वाय. कोनारा (युनिव्हर्सिटी ऑफ रुहुणा, श्रीलंका), प्रा. डॉ. परिक्षित महाल्ले , पुणे, डॉ. देवानंद के. चिलवंत, डॉ. विरभद्र चनबस दंडे, एन.बी.एन. सिंहगड इन्स्टिट्यूट, सोलापूरचे प्राचार्य डॉ. एस. डी. नवले, डॉ. गणेश पिसे (पुणे) यांची ओळख करून देऊन सत्कार करण्यात आला. 

उदघाटन समारंभास प्रा. डॉ. के. एम. एस. वाय. कोनारा आणि प्रा. डॉ. परिक्षित महाल्ले हे प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे परिषदेचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला. यावेळी डॉ. विरभद्र चनबस दंडे, प्रा. डॉ. परिक्षित महाल्ले व प्रा. डॉ. के. एम. एस. वाय. कोनारा यांची अभ्यासपूर्ण भाषणे झाली. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते इंटेलिजंट कम्प्युटिंग अँड व्हिजन टेक्नॉलॉजीज (ICICVT-2025) सोव्हेनियर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

प्रा. डॉ. परिक्षित महाल्ले यांनी जनरेटिव्ह एआय व एजेंटिक इंटेलिजन्स या नव्या संकल्पनांवर प्रकाश टाकत, संशोधनासाठी अधिकाधिक लोकांना जोडण्याचे व भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच एआय तंत्रज्ञानामुळे माणसांची कार्यक्षमता वाढणार असून त्यांचा परिणाम कोणत्याही नौकरीवर होणार नाही. तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी चॅट जीपीटीचा वापर आवश्यक असेल तरच करावा अन्यथा बौध्दीक क्षमतेवर परिणाम होईल असेही मत मांडले. 

प्रा. डॉ. कोनारा यांनी स्मार्ट ग्रिड्स व बुद्धिमान ऊर्जा प्रणाली क्षेत्रातील संशोधन व नवोन्मेषाचे महत्त्व विशद केले.

या उदघाटन सत्रास देश-विदेशातील संशोधक, प्राध्यापक, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. या परिषदेच्या माध्यमातून संशोधन, ज्ञानविनिमय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना मिळणार आहे.

या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत मुख्य भाषणे, आमंत्रित व्याख्याने व ९० हून अधिक तांत्रिक शोध निबंध सादरीकरणांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती देण्यात आली. कार्यक्रमास सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. स्मिता नवले उपस्थित होत्या. 

आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी होणेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, संजोयक डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. नामदेव सावंत, पब्लिकेशन डिन डॉ. संपत देशमुख व सह-संयोजक प्रा.संदीप लिंगे व प्रा. स्वप्निल टाकळे तसेच सर्व विभाग प्रमुख व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैष्णवी उत्पात यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. नामदेव सावंत यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad