पंढरपूर सिंहगड मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची रेल्वे स्टेशन ला भेट*

 *पंढरपूर सिंहगड मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची रेल्वे स्टेशन ला भेट*



पंढरपूर: प्रतिनिधी


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे भेट दिली असल्याची माहिती प्राचार्य डॉ कैलाश करांडे यांनी दिली.

   इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाने तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे स्टेशन पंढरपूर ला औद्योगिक भेट हि शनिवार दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी आयोजित केली होती. 

या भेटीचा मुख्य उद्देश रेल्वे स्टेशन मध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टीम चे वर्किंग व कंट्रोलिंग कसे चालते याची माहिती घेणे हा होता. या भेटीतून विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टीम वर्किंग, इलेक्ट्रिक कंट्रोल सिस्टीम व बॅटरी इलेक्ट्रिक सिस्टीम याची माहिती साईट इंजिनिअर यांनी दिली. 

 या औद्योगिक भेटीसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील ६० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 

 ही औद्योगिक भेट यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख प्रा. व्ही. पी. मोरे, औद्योगिक भेट समन्वयक प्रा. ए. एन. गोडसे, प्रा. पी. बी. व्यवहारे, प्रा. एन. व्ही. खांडेकर, वंदना माळी सह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad