शेतकऱ्यांचा फायदा झाला तर पशुधनात वाढ होईल -सहआयुक्त डॉ. संतोष पंचपोर



शेतकऱ्यांचा फायदा झाला तर पशुधनात वाढ होईल

                                                                                   -सहआयुक्त डॉ. संतोष पंचपोर



स्वेरीत ‘जागतिक पशुवैद्यक दिना’ निमित्त ‘तांत्रिक परिसंवाद’ व पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न


पंढरपूर- ‘सध्याच्या भारताची लोकसंख्या विचारात घेतली असता दुध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी व मांस अशी उत्पादने कमी पडत आहेत. भविष्यात या गोष्टींची कमतरता भासू लागेल. यासाठी सध्या उत्पादन क्षेत्रांमध्ये क्षमता वाढवण्याची गरज असून यामध्ये विकास करून पशु प्राण्यांमधील आजार कमी करणे हे आपल्यापुढे आव्हान उभे आहे. भविष्यात पशुपालनाचा फायदा होण्यासाठी आत्ताच त्यांमधील आजार ओळखून ते जलद उपचार करून कमी करावे लागतील. शासन यासाठी सर्वोतोपरी मदत करत आहे परंतु आपल्याला कामाची व्याप्ती वाढवावी लागणार आहे. उद्योगात प्रगती होण्यासाठी भविष्यकाळात चांगले पशु, चांगले उद्योजक निर्माण होतील यासाठी ग्रामीण भागात, उद्योजक व शेतकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मार्गदर्शन केले पाहिजे. यातून कसा फायदा होईल हे ही पटवून दिले पाहिजे. यासाठी दूध, अंडी, मांस यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे तसेच पशु प्राण्यांना वेळेत लसीकरण करून घ्यावे. सध्याचे शेतकरी सुशिक्षित झाले आहेत. यासाठी आपण स्वतः अपडेट राहणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा फायदा झाला तरच पशुधनात वाढ होईल,’ असे प्रतिपादन पुणे विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धनचे सहआयुक्त डॉ. संतोष पंचपोर यांनी केले.

          ‘जागतिक पशुवैद्यक दिना’ निमित्त ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान, पंढरपूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये ‘तांत्रिक परिसंवादा’चे तसेच ‘स्व. डॉ. सुहास देशपांडे जीवन गौरव पुरस्कार’ व ‘स्व. डॉ. चंद्रकांत निंबाळकर उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार’ या उपक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी पुणे विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धनचे सहआयुक्त डॉ. संतोष पंचपोर हे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी पशुसंवर्धन विभाग, सोलापूरचे उपायुक्त डॉ. समीर बोरकर हे होते. दीप प्रज्वलनानंतर तसेच स्व. डॉ. सुहास देशपांडे व स्व. डॉ. चंद्रकांत निंबाळकर यांच्या प्रतिमा पुजनानंतर प्रास्तविकात ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वासराव मोरे यांनी ‘जागतिक पशुवैद्यक दिना’चे महत्व सांगून कार्यक्रम आयोजिन्याचा हेतू स्पष्ट करून ‘ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान’ची वाटचाल सांगितली. पंढरपूर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.प्रियांका जाधव-कोळेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. ‘तांत्रिक परिसंवाद’ मध्ये परभणीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. नितिन मार्कंडे यांनी ‘वंध्यत्व निवारण व व्यवस्थापन’ या विषयावर व शिरवळच्या केएनपी पशुवैद्यक महाविद्यालयाचे प्रा. डॉ.विठ्ठल धायगुडे यांनी ‘रोगनिदान तपासण्यांचे महत्व’ या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले. यानंतर महाराष्ट्र‌ राज्य पशुवैद्यक परिषद, नागपूरचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप घोरपडे, पशुसंवर्धन विभागाचे माजी सहआयुक्त डॉ. महेश बनसोडे, जिल्हा पशु सर्वरोग चिकित्सालय, सोलापूरचे सहाय्यक आयुक्त डॉ. भास्कर पराडे व स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाव्हेटचे अध्यक्ष डॉ. रामदास गाडे यांनी अल्प भाषणात ईस्त्राईल मधील विकासात्मक कृषी विभागाचे उदाहरण देवून सध्या पशुवैद्यक क्षेत्रात होत असलेली बोगस पशुवैद्यक अधिकाऱ्यांची घुसखोरी थांबविण्याची मागणी केली. यासाठी स्थानिक प्रतिनिधींना भेटून निवेदन देवून समस्या मांडण्यासाठी प्रेरित केले. यावेळी पशुवैद्यक क्षेत्रातील अतुलनीय योगदान पाहून डॉ. दिलीप घोरपडे व डॉ. महेश बनसोडे यांना ‘स्व. डॉ. सुहास देशपांडे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर डॉ.भाग्यश्री राठोड (दक्षिण सोलापूर), डॉ. विष्णू होळकर (वाघदरी-अक्कलकोट), डॉ. सचिन कंपने (बोरामणी-उत्तर सोलापूर), डॉ.ओम सोनाळे (मोहोळ), डॉ.कैलास कच्छवे (मोडनिंब), डॉ. आर.एन. होळकर (करमाळा), डॉ.पी.टी.मांजरे (जवळगाव-बार्शी), डॉ. रवींद्र बंडगर (मरवडे- मंगळवेढा), डॉ. श्रीकांत सुर्वे (सांगोला), डॉ.अतुल चुकेवार (माळशिरस), डॉ. शामराव वायबसे (वाळवा-सांगली), डॉ. लक्ष्मण गाढवे (आटपाडी-सांगली) या पशुधन विकास अधिकाऱ्यांचा ‘स्व. डॉ. चंद्रकांत निंबाळकर उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार’ म्हणून तर डॉ. रविंद्र वर्धमान यांना पशुधन अधिकारी व योगा बाबत जनजागृती केल्याबद्धल विशेष सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्ती डॉ.दिलीप घोरपडे व डॉ.महेश बनसोडे यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, ‘आम्ही आमचे कार्य करत राहिलो, पण चांगल्या कार्याची दखल कुठे ना कुठे घेतली जाते.’ असे सांगून कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात डॉ. बोरकर म्हणाले की, ‘सेवा निवृत्तीनंतर देखील पशु सेवेचे व्रत डॉ. विश्वासराव मोरे यांनी विश्वासाने जपले असून सातत्याने कार्यरत राहतात प्रत्येक वर्षी काही न काही उपक्रम करून ते इतरांना प्रेरित करत असतात. यासाठी त्यांचा अभिमान वाटतो.’ ‘जागतिक पशुवैद्यक दिना’ निमित्त कार्यक्रमाच्या ठिकाणी पशु-प्राण्यांबद्दल जनजागृतीचे फलक, लस, मात्रा याबाबतची माहिती असलेले पोस्टर्स लावण्यात आली होती. यावेळी डॉ. नंदकुमार सरदेशमुख, तालुका पंचायत समितीचे प्र.सह आयुक्त डॉ. राजेंद्र सावळकर, मंगळवेढ्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. सुहास सलगर, डॉ. शिवराज पवार (खरसोळी), श्रीमती संगीता निंबाळकर, श्रीमती प्रिया देशपांडे, चैतन्य देशपांडे, सौ. वृषाली मोरे, सह आयुक्त डॉ. शेखर बागल, डॉ. शिवकुमार खळगे, यांच्यासह राज्यातील पशुसंवर्धन विभागातील जवळपास २०० अधिकारी, शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिक उपस्थित होते. साताऱ्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे व पशुसंवर्धन विभाग, पुणेचे उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांच्यासह इतर सहकाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर संघटनेचे कोषाध्यक्ष डॉ. नंदकुमार होनराव यांनी आभार मानले.  


चौकट- पशु-प्राणी तपासणीच्या हेतूने पशुधन विकास अधिकारी ग्रामीण भागात उन्हा तान्हात रानोमाळ भटकंती करत असतात. त्यांचा उन्हापासून बचाव करून पशुवर व्यवस्थित उपचार करण्याच्या हेतूने पशु चिकित्सेसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘मॅनकाइंड फार्मा’ या कंपनीकडून या परिसंवादासाठी उपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांना पांढऱ्या रंगाची आकर्षक टोपी मोफत देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad