राजकीय अस्तित्वासाठी परिचारक समर्थकांची पोटसूळ*

 राजकीय अस्तित्वासाठी परिचारक समर्थकांची पोटसूळ


आमदार अभिजीत पाटील समर्थकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत आमच्या नेत्यांवर खालच्या भाषेत टीका केली तर जशास तसे उत्तर देण्याचा दिला इशारा



पंढरपूर /प्रतिनिधी 


पंढरपुर येथे तब्बल आठ वर्षानंतर पार पडलेल्या आमसभेवरून समाज माध्यमांवरून आमसभेच्या अध्यक्षाविरोधात आणि उपस्थित आमदारांविरोधात परिचारक समर्थकांकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते.

यानंतर सोमवारी माजी आमदार प्रशांत परिचारक समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन आमसभेचा निषेध करत आ. अभिजीत पाटील, आ राजू खरे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर मंगळवारी आमदार अभिजीत पाटील समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन परिचारक समर्थकांचा चांगला समाचार घेतला.

 


आमदार अभिजीत पाटील समर्थकांच्या पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मागील अनेक वर्षांपासून सामान्य नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी आमसभा घेण्यात आली नाही.

आठ वर्षानंतर आमसभा घेऊन आमदार अभिजीत पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न मांडण्याची संधी दिली. 

सदर आमसभा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आमसभेचा अध्यक्ष निवडून नियमानुसार घेण्यात आली. 

आमसभेसाठी ४० हुन अधिक खात्याचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लागल्यामुळे आमसभेने चारही आमदारांचा अभिनंदनचा ठराव मांडला.


मात्र परिचारक समर्थकांनी आपले अस्तित्व संपत चालल्याने आमसभेचा निषेध करून आपले राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होत असल्याने पोटसुळ उठला असल्याचे दाखवून दिले आहे. 

आधी त्यांनी मागील पंचवीस वर्षात काय काम केले ते सांगावे. त्यांनी संस्थांची वाट लावली असल्याची टीका आमदार अभिजीत पाटील समर्थकांनी केली.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, किरणराज घाडगे, संदीप मांडवे, नागेश गंगेकर, अनिता पवार, अमर सूर्यवंशी, प्रशांत शिंदे, तुकाराम मस्के, महादेव तळेकर,गणेश ननवरे, विशाल आर्वे, उपस्थित होते.


यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले म्हणाले की आठ वर्षानंतर शासकीय नियमानुसार आमसभा पार पडली. 

यामध्ये ग्रामीण आणि शहरातील प्रश्न मांडण्यात आले. जास्तीत जास्त ग्रामीण भागातील नागरिकांना प्रश्न मांडण्याची संधी दिली गेली. महिलांनाही प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले. शहरात लवकरच नगरपालिकेचे दवाखाने, सर्व शाळा सुरू होतील. पाण्यावर अधिकचा टॅक्स लागणार नाही. या आमसभेत नागरिकांसाठी ६ कोटी रुपयांचा काय झाला.

मात्र शहरातील सुरू असलेल्या ११ रस्त्यांबाबत प्रश्न उपस्थित केल्याने आणि आपले राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होऊ लागल्याने परिचारक समर्थकांनी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आमसभेचा निषेध केला आहे. असा आरोप करत मागील अनेक वर्षांपासून नगरपालिकेवर प्रशासक असल्याने त्यांना बोलण्याचा अधिकार नाही असा सवाल उपस्थित करत त्यांनी १८० कोटी नगरपालिकेचे वार्षिक बजेट असताना यावर नागरिकांनी बोलू नये का? शहरातील नागरिक कर भरत आहेत. मात्र अनेक वर्षांपासून शहरातील नगरपालिकेचे दवाखाने बंद,बागा बंद, क्रीडांगण नाहीत. रस्त्याची दुरावस्था झाली आहे, शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. नगरपालिकेवर २५ वर्ष परिचारक पार्टीची सत्ता असताना काय केले ते सांगा असा प्रतिसावाल केला.


यावेळी बोलताना किरण घाडगे यांनी नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत आहे. शहरात सुरू असलेल्या कामांमध्ये कमिशन जास्त घेतले जात असल्याने निकृष्ट दर्जाचे काम होत आहेत. एकाच ठेकेदाराला वारंवार काम दिले जात आहे. असा आरोप करत. यावर बोलण्याचा अधिकार नाही का? असा सवाल उपस्थित केला. याबाबत शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी धाडस दाखवून आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर शहरात आमसभा घ्यावी अशी मागणी केली.



यावेळी संदीप मांडवे म्हणाले की मालकशाही उध्वस्त करण्याच्या उद्देशाने आणि नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमसभा घेण्यात आली नव्हती तर ती जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी होती. मात्र विरोधक काहीही बोलत आहेत. एक महिन्यांपूर्वी आमसभा घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना आले होते.

तरी देखील नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांना उत्तर देता आले नाही. काही अधिकारी गैरहजर होते. याचा निषेध विरोधकांनी केला पाहिजे होता. मात्र ते अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत.

आ.अभिजीत पाटील यांनी पंढरपूर तालुक्याशी संबंधित चारही आमदारांना एकत्र आणल्याने त्यांना दुःख झाले असेल अशी मार्मिक टीका करत आम्ही कोणालाही टार्गेट करत नाही परंतु आमच्या नेत्यांवर खालच्या भाषेत टीका केली तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला.

यावेळी विठ्ठलचे संचालक तुकाराम मस्के म्हणाले की ऊस दरावर प्रश्न विचारण्यात आले, आमसभेचा निषेध करण्यात आला, मात्र विरोधकांना माहीत नाही की आ. अभिजीत पाटील यांनी जिल्ह्यात सर्वात जास्त आत्तापर्यंत गळीत हंगामाचे २८०३ रुपये दर सर्व शेतकऱ्यांना देण्याचे काम केले आहे. पुढील काळात सर्व जाहीर केलेला दर मिळेल. मात्र परिचारकांच्या भोवती साईड हिरोची भूमिका बजावणारे उगाच टीवटीव करत असल्याचे टीका केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad