सोलापूर जिल्ह्यात बोगस खते व औषधे बनविणारे विक्री करणारांचा तत्काळ बंदोबस्त करावा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचेकडे सचिन जगताप यांची मागणी
*सोलापूर जिल्ह्यात विविध खते विक्रेत्यांच्या माध्यमातून बोगस खते व औषधे विक्री होत असून शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या फसवणूक होत आहे. सोलापूर जिल्ह्यात ठिक-ठिकाणी अवैधरित्या कंपन्या काढून खते / औषधे (पिडीयम पोटॅश, सिलीकॉन, लिक्वीड इत्यादी) बनविले जात असून कोणत्याही प्रकारची प्रतवारी नसून बनावट प्रतीच्या औषधे व खतांची चढ्या दराने खुलेआमपणे विक्री होत असल्याने या औषधे / खतांमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे आतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत असून शेतकरी कर्जबाजारी होत आहे. तरी अशा ठिकठिकाणी सुरू असलेल्या कंपन्यावरती व दुकानदारांवरती धडक पद्धतीने तात्काळ कारवाई व्हावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने कृषी मंत्री यांचे घरासमोर आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी याचे निवेदन मा.कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना सोलापूर जिल्हा कृषी अधीक्षक यांचेकडे देताना सचिन जगताप-जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड सोलापूर,अविनाश जगताप उपस्थित होते*