पालकांनी पाल्याचा आत्मविश्वास वाढवावा -प्रा.अविनाश मोटे स्वेरीच्या 'इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ मध्ये पालक मेळावा संपन्न


पालकांनी पाल्याचा आत्मविश्वास वाढवावा

                                                                     -प्रा.अविनाश मोटे

स्वेरीच्या 'इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ मध्ये पालक मेळावा संपन्न



पंढरपूर– ‘अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांचा कल ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ विभागाकडे अधिक राहिला असून भविष्यात या शाखेचे महत्व वाढत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी या क्षेत्राचा अभ्यास करून नोकरीच्या संधी शोधाव्यात. हे करत असताना पालकांनी आपल्या पाल्याचा आत्मविश्वास कसा वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पाल्य नेमके काय करतो याकडे गंभीरतेने लक्ष देणे आवश्यक आहे कारण करिअर करण्यासाठी पाल्याचा आत्मविश्वास वाढविणे अत्यंत आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा.अविनाश मोटे यांनी केले.

           गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ विभागातर्फे आयोजिलेल्या ‘पालक मेळाव्या’त ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा.अविनाश मोटे हे मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. बादलकुमार यांच्या नेतृत्वाखाली या पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून दिगंबर घुले तर महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ. मिनाक्षी व्हटे हया उपस्थित होत्या. प्रास्ताविकात डॉ. बादलकुमार यांनी महाविद्यालयाअंतर्गत असलेल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील अभ्यासक्रम, उपक्रम, इफेक्टिव टिचिंग-लर्निंग, संशोधन व त्यासाठी मिळालेला निधी, पेटंट, इंटरप्रेन्युरशिप, उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग, उपलब्ध साहित्य सामग्री, कामाचे स्वरूप, अलीकडे इलेक्ट्रिकल वाहनांच्या संख्येत का वाढ होत आहे? तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर यासाठी नोकरी कुठे उपलब्ध असतात याची माहिती दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा.अविनाश मोटे यांनी पुढे बोलताना विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी आवश्‍यक असणारी तयारी, विद्यार्थ्यांना मोठमोठ्या पॅकेजच्या कंपन्या कशा मिळतात? यासाठी पालकांनी कोणती भूमिका घ्यावी? प्लेसमेंटसाठी कंपनीत उपलब्ध जागा, इलेक्ट्रिकल वाहनांचे जागतिक बाजारपेठेत वाढते महत्व, विविध कोअर कंपन्या, या विषयांची माहिती सांगून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी पालकांनी कोणती जबाबदारी घेतली पाहिजे? यावर माहिती दिली. महिला पालक प्रतिनिधी सौ. मिनाक्षी व्हटे म्हणाल्या की, ‘स्वेरी सारखे महाविद्यालय जिल्ह्यात कोठेही नसून स्वेरीचा अभ्यासाबाबतचा पाठपुरावा, नियमित करून घेत असलेला अभ्यास व यातील सातत्य त्यामुळे आमची मुले व मुली तंत्रशिक्षणात यशस्वी होत आहेत. त्यामुळे आम्ही पालक वर्ग स्वेरीच्या संपूर्ण नियोजनावर समाधानी आहोत.’ असे सांगून स्वेरीतील शिक्षणामुळे पालक वर्ग का निश्चिंत राहतो याची अनेक उदाहरणे दिली. अध्यक्षस्थानावरून बोलताना उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार म्हणाल्या की, ‘आपले पाल्य व त्याची प्रगती पाहताना पालकांनी वेळोवेळी महाविद्यालय प्रशासन, विभागप्रमुख, वर्गशिक्षक यांच्याशी संवाद साधून पाल्याची प्रगती जाणून घ्यावी. आपले विद्यार्थी जागतिक पातळीवरील स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी इंग्रजी संभाषण, स्पर्धा परीक्षेची तयारी विविध संशोधन स्पर्धा यासाठी महाविद्यालय व्यासपीठ देते. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याच्या दृष्टीने पालकांनी जबाबदारी ओळखून पाल्याच्या करिअर संबंधी पाठपुरावा करावा. पालकांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पाल्य सावध होवून अभ्यासात अपडेट राहतो.’ यावेळी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या, संशोधन स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा सन्मान पालकांच्या साक्षीने करण्यात आला. पालक मेळाव्यानंतर दिगंबर घुले, चंद्रकांत महाडिक, शिवाजी जाधव, दिलीप कदम, सुनील आवटे, सौ. बाबर, राजेंद्र भोसले, अशोक व्हटे आदी पालकांनी मनोगत व्यक्त करून काही प्रश्न उपस्थित केले. उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी काही समस्यांचे जागेवरच निराकरण केले तर काही प्रश्न वरिष्ठ पातळीवरून सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर असे मिळून जवळपास १५० पालक, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मोहन ठाकरे, वसतिगृह व्यवस्थापक डॉ. के. बी. पाटील, इन्फ्रास्ट्रक्चर अधिष्ठाता डॉ.डी.ए.तंबोळी, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी सचिवा नम्रता घुले, विद्यार्थी उपस्थित होते. या पालक मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा. डी.डी. डफळे यांनी केले तर समन्वयक प्रा. व्ही. ए. सावंत यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad