स्वेरीच्या ज्ञानेश्वरी कांबळे यांची महापारेषण मध्ये निवड

                                                                                                          

स्वेरीच्या ज्ञानेश्वरी कांबळे यांची महापारेषण मध्ये निवड



पंढरपूर- कोरोना कालावधीत आलेली संकटे त्यातून परिवाराची संघर्षात्मक पार्श्वभूमी आणि या सर्व संकटांवर मात करण्यासाठी पाठीशी उभे राहिलेले स्वेरीचे डॉ.रोंगे सर! या सर्व बाबी जीवनाचे सर्व गणित बदलण्यास कारणीभूत ठरल्या. होय! डॉ. रोंगे सरांच्या बहुमोल मार्गदर्शनाला परिश्रमाची जोड मिळाली आणि हाताला नोकरी नावाचे ‘चवदार फळ’लाभले. खरंच हे सर्व अविश्वसनीय वाटते ना? ग्रामीण भागातील एक मुलगी चक्क महापारेषण मधील नोकरीला गवसणी घालते, ही बाब पंढरपूर पंचक्रोशीतच नव्हे तर सोलापूर जिल्ह्याला आत्ता कौतुकास्पद बनली आहे.

           आढीव (ता.पंढरपूर) येथील ज्ञानेश्वरी सज्जन कांबळे यांना दहावीला ९२ टक्के आणि १२ वीला ७० टक्के मार्क्स मिळाल्यानंतर ज्ञानेश्वरीचे सोलापूरात स्थायिक असलेले मामा लक्ष्मण यशवंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भविष्याचा विचार करून ज्ञानेश्वरी हिला गोपाळपूर (ता.पंढरपूर) मधील स्वेरीमध्ये तंत्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्याचे ठरवले. २०१९ मध्ये तिने स्वेरीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये प्रवेश घेतला. स्वेरीमध्ये प्रवेश घेतल्यावर दहावी आणि बारावी प्रमाणेच इंजिनिअरिंगला देखील ट्युशन लावण्याची गरज नाही हे समजले. स्वेरी अंतर्गत असलेल्या वसतिगृहामध्ये राहून चारही वर्ष इंजिनिअरिंगचा अभ्यास केला. 'सेल्फ स्टडी' व 'नाईट स्टडी' करणे याची आता तिला सवय जडली होती. डॉ.रोंगे सरांचे व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन यावर त्यांनी २०२३ साली इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. तिथून पुढे त्यांनी 'आता थांबणे नाही' हे ठरवले.अखेर महापारेषण मध्ये त्यांची सहाय्यक अभियंता म्हणून नुकतीच निवड झाली. ज्ञानेश्वरी हिने फेब्रुवारी २०२५ मध्ये महापारेषणची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्या ही परिक्षा उत्तीर्ण झाल्या. ‘स्वेरीतील शिस्तबद्ध शिक्षणाने रचला पाया, परिश्रमाने चढविला कळस आणि महापारेषणमध्ये नोकरी मिळवून फडकविला झेंडा’ अशी त्यांची यशोगाथा झाली. ज्ञानेश्वरी कांबळे हिच्या यशामध्ये स्वेरीचा व डॉ. रोंगे सरांचा बहुमोल वाटा आहे, हे माहित झाल्यावर त्यांच्या मामांनी स्वेरीमध्ये येऊन डॉ. रोंगे सरांची भेट घेतली. कोरोनामुळे ज्ञानेश्वरीच्या वडिलांचे निधन झाले तर दुसरीकडे जिद्द, परिश्रम आणि कष्ट करण्याची तयारी करून घेतलेल्या डॉ.रोंगे सरांचे त्यांना बहुमोल मार्गदर्शन मिळाले. ‘कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर कष्ट, जिद्द आणि चिकाटीची आवश्यकता असते.’ हे डॉ. रोंगे सरांचे प्रेरणादायी वाक्य त्यांनी अंगवळणी लावून घेतले. त्यामुळेच हे यश प्राप्त झाले. डॉ.रोंगे सरांचे प्रत्येक शब्द प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असतात, यशाकडे झेपावण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. ज्यावेळी संकेतस्थळावरील यादीद्वारे ज्ञानेश्वरीची निवड झाल्याचे  समजले त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, ‘मी अवघड काळातून एका सन्माननीय पदावर पोहोचले याचे श्रेय मी मामांबरोबरच नाईट स्टडी व सेल्फ स्टडी, स्वेरी आणि डॉ. रोंगे सरांना देते.’ असे प्रतिपादन केले. महापारेषणमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाल्याबद्दल माजी विद्यार्थिनी ज्ञानेश्वरीला ‘जागतिक महिला दिनी’ पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील व ब्रम्हकुमारी उज्वलाबहन यांच्या हस्ते आई श्रीमती रंजना कांबळे व मामा लक्ष्मण वाघमारे व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. ज्ञानेश्वरी कांबळे यांची महापारेषण मध्ये निवड झाल्याबद्दल स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख यांच्यासह इतर विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख डॉ. बादलकुमार, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad