स्वेरीच्या विद्यार्थ्यांची पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाच्या ‘इन्क्युबेशन सेंटर’ला सदिच्छा भेट
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाने इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन (इसा) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या इन्क्युबेशन सेंटरला भेट दिली व तेथील संपूर्ण माहिती व कार्यपद्धती जाणून घेतली.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.बादलकुमार यांच्या नेतृत्वाखाली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी इन्क्युबेशन सेंटरला दिलेल्या अभ्यासपूर्ण भेटीत तेथील इनोव्हेशन इकोसिस्टमची माहिती मिळाली. उद्योजकता आणि इनक्युबेशन संबंधित प्रक्रियांबाबत सखोल समज विकसित करणे हा देखील या भेटी मागचा मुख्य उद्धेश होता. या उपक्रमाने प्राध्यापकांना तंत्रज्ञान, स्टार्टअप परिसंस्था आणि औद्योगिक प्रवृत्तींबद्दल महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी मिळवून दिली, यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमात नवकल्पना आणि उद्योजकता समाविष्ट करू शकता येते. तसेच शिक्षणाला उद्योगाशी जोडताना आंतरशाखीय संशोधन, सहकार्य आणि उद्योग भागीदारीसाठी नवीन दालन सुरु करण्याची संधी मिळणार आहे. या भेटीतून स्टार्टअप, संस्थापक आणि इनक्यूबेशन तज्ञांसोबतच्या संवादामुळे व्यावसायीकरणाच्या संधी, निधी मिळविण्याच्या प्रणाली आणि बौद्धिक संपदा व्यवस्थापन याविषयी प्राध्यापकांचा दृष्टिकोन समृद्ध झाला. या भेटी प्रसंगी इन्क्युबेशन केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश गुरानी व व्यवस्थापक नितीन माळी यांनी या सेंटर विषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी नव्या स्टार्टअप साठी उपलब्ध सुविधा आणि नवीन स्टार्टअपसाठी अनुसरायची प्रक्रिया याबद्दल सांगितले. या भेटीतून व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यास प्रोत्साहन मिळाले. व्यवसाय मॉडेल्स, उत्पादन विकास आणि स्टार्टअप निधी मिळविण्याच्या प्रक्रियेचा तेथे प्रत्यक्ष अनुभव मिळाला तसेच या अनुभवाने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्टार्टअप आव्हानांचा सामना करण्यासाठी, इंटर्नशिप शोधण्यासाठी आणि मार्गदर्शनाच्या संधींचा शोध घेण्यासाठी प्रेरित केले. यातून आपल्या कल्पना व्यवहार ज्ञान आणि संबंधित उपक्रमांमध्ये रुपांतरित करण्याची प्रेरणा मिळाली. स्टार्टअप परिसंस्था आणि नवकल्पना बाबत माहिती मिळवून देणे, शिक्षण आणि उद्योग यामधील अंतर कमी करणे, तसेच प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना अशा नवकल्पनांमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करणे हा या भेटीचा उद्देश असुन भविष्यात स्टार्टअप्स, पेटंट्स आणि उद्योग सहकार्यासाठी जागतिक बाजारपेठेत अनेक संधी निर्माण होतील. इन्स्टिटयूशन्स इनोव्हेशन कौन्सिल उच्च शिक्षण संस्थांमध्ये नवकल्पना आणि उद्योजकतेला प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि परिसंस्था विकासाद्वारे प्रोत्साहन देते. स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर ने नवकल्पना आणि स्टार्टअप्सच्या प्रोत्साहनासाठी केलेल्या उत्कृष्ट प्रयत्नांसाठी शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल (एमओई सेल) कडून नुकतेच ३.५ स्टार रेटिंग मिळवले आहे. सदर उपक्रमात स्वेरीतील आयआयसी चे अध्यक्ष डॉ. दिग्विजय रोंगे, समन्वयक प्रा. सागर कवडे, विभागातील प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी यश पाटील, सुजित भंडारे, आकाश माने, मोहित लोंढे, निखिल वाघचवरे, सानिका बागल व समीक्षा गटकळ या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.