कालवा सल्लागार समितीचे बैठकीत आ.समाधान आवताडे यांची तळमळ

Top Post Ad

 कालवा सल्लागार समितीचे बैठकीत आ.समाधान आवताडे यांची तळमळ 


मतदार संघातील शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठीच आक्रमक 



पंढरपूर/प्रतिनीधी 


पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार समाधान आवताडे यांनी आवर्जून उपस्थित राहून, मतदारसंघातील पाण्यासाठी या बैठकीत आक्रमक होत शेतकऱ्यांची शेतीच्या पाण्याची अडचण दूर करण्यासाठीच मोठी तळमळ दिसुन आली.



सदरची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री .अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदा मंत्री .ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली.


    या बैठकीत नीरा डावा कालवा, नीरा उजवा कालवा या प्रकल्पांच्या उन्हाळी हंगाम २०२४-२५ साठी सिंचनाच्या पाण्याच्या नियोजनावरही यावेळी चर्चा करण्यात आली.नीरा भाटघर उजव्या कालव्याखालील सिंचन टेल टू हेड या पद्धतीने पद्धत राबवून प्रत्येक नळीवर बारकाईने लक्ष देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणे गरजेचे आहे.

नीरा उजवा कॅनोलद्वारे शेती सिंचन अवघड झाले असून कासेगांव, अनवली, बोहाळी, टाकळी, कोर्टी, रांझणी, खर्डी, उंबरगाव, एकालासापूर, तावशी ही गावे ओलीताखाली आहेत मात्र अधिकाऱ्यांच्या चुकीच्या आणि गलथान कारभारामुळे बरेच शेतकरी गेल्या वर्षी पाण्यापासून वंचित राहिली होती तरी या चालू हांगमा मद्ये शेतकऱ्यांना पाणी पोहोचणे आवश्यक आहे. असे उपस्थीत अधिकारी यांना ठणकावून सांगितले.

भरणे न भिजता पर्क्यूलेशनच्या नावाखाली शेतकरी यांचेकडून बाक्या दुप्पट घेतल्या जातात. त्या बाक्या कमी करून मिळाव्यात.



पाणी मागणी फॉर्म भरणेसाठी मागील रक्कम २५ ते ३० टक्के भरून घेऊन पुढील फॉर्म भरून घ्यावे. पाणी न मिळाल्यास द्राक्ष, डाळिंब, बोर, इ. बागांचे शेतकऱ्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.

नीरा भाटघरच्या प्रत्येक अधिकाऱ्याने त्या स्वतः साईटवर थांबून भरणे काढावेत. एका कर्मचाऱ्याला १०ते २०नाल्या दिल्या जातात. त्यामुळे पाण्याचे नियोजन होत नसून भरणे भिजत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी काळजी घेणे गरजेचे आहे. असेही आ समाधान आवताडे यानी सुचविले.

मार्च २०२४रोजी या उन्हाळी पाळीला भरणे न भिजवता पाणी पळवत वर नेले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळ बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.


उंबरगाव, बोहाळी, कोर्टी ओढ्यावरील बंधारे भरण्यात यावेत, कारण तिन्ही गावातील पिण्याचे पाण्याची विहिरी त्यावरती आवलंबून आहेत. यासह अनेक प्रश्न उपस्थीत केले.


यावेळी उपस्थित मंत्री महोदयांनी व अधिकारी वर्गाने सकारात्मकता दाखवत लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.यावेळी राज्यमंत्री .ना.सौ.माधुरीताई मिसाळ, सार्वजनिक क्रीडामंत्री ना.दत्तात्रय मामा भरणे , माजी विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, आमदार उत्तमराव जानकर, आमदार राहुल कुल, माजी खासदार .रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार सातपुते, आ. श्सिद्धार्थ शिरोळे, आ. शंकर मांडेकर, आ.भिमराव तापकिर, आ. कांबळे

आ. डॉ. .बाबासाहेब देशमुख, माजी मंत्री आमदार विजयबापू शिवतारे,

राज्यसभा खासदार प्रा.डॉ.सौ.मेधाताई कुलकर्णी, आमदार हेमंत रासणे आदी मान्यवर सहकारी तसेच खात्यांचे प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.




*आ. आवताडे यांच्या मागणीची तत्काळ दखल*


शनिवारी पुणे येथे निरा उजवा आणि डावा कालवा मधून उन्हाळी पाळी बाबत बैठकीत चर्चा सूरू होती. लवकरात लवकर पाणी मिळावे ही मागणी आ. समाधान आवताडे यांनी लावून धरली होती. याची तत्काळ दखल घेतंली गेली आहे. यामुळे रविवारी पाणी सोडण्यात आले आहे. ही बाब शेतकऱ्यांना सुखद करणारी आहे. यामुळेच केवळ पोकळ गप्पा मारून वेळकाढूपणा नाही तर कर्तव्य बजावणारा आमदाऱ म्हणूण मतदार संघात ओळख वाढू लागली आहे. याचीच प्रचिती म्हणूण मतदारानी दुसऱ्यांदा संधी दिली आहे

Below Post Ad

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.