*लोकशहिर साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांना नगर परिषदेत विनम्र अभिवादन..*
पंढरपूर, प्रतिनिधी : साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर नगर परिषद सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी *नगराध्यक्षा डॉ.सौ.प्राणिताताई भगीरथ भालके यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.*
यावेळी बोलताना नगराध्यक्षा डॉ. प्राणिताताई भालके यांनी लोकशाहीर संहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, लोककला आणि सामाजिक कार्यातून वंचित, शोषित व कष्टकरी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे असून सामाजिक समता, बंधुता आणि न्यायाची मूल्ये जपण्यासाठी त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील, असे सांगितले.
कार्यक्रमास नगर परिषदेचे नगरसेवक सुधीर धोत्रे, नगरसेवक संजय बंडपट्टे, किरण घाडगे, विनायक देवमारे, प्रसाद कळसे, मुख्य अधिकारी महेश रोकडे, अधिकारी, कर्मचारी, तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

