*पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांची टाईल्स व टेक्स्टाइल येथे भेट*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवार दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी पंढरपूर येथील वासवी टाईल्स व टेक्सटाइल भेट देऊन माहिती घेतली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी इंडस्ट्रिअल शेड ची व टाईल्स खरेदी विक्री ची सर्व माहिती जाणून घेतली तसेच त्यासाठी लागणारे उपकरणे, भांडवल व प्रक्रिया याबद्दल माहिती संग्रहित केली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नास समर्पक उत्तरे उपस्थित अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली त्याबद्दल सर्वानी त्यांचे आभार मानले.
याशिवाय इंडस्ट्रिअल शेड एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. निसर्गात उपलब्ध असलेल्या घटकांचा योग्य उपयोग करून स्टील तयार केले जाते. ते सिव्हिल इंजिनियरिंग मधील एक मुख्य घटक आहे. शेड वर येणारे लोड , ट्रस, टेन्शन मेंबर, पूर्लिन, स्टील कॉलम, कॉलम बेस या प्रत्येक यंत्रणेची सविस्तर माहिती रेखाचित्रांसह उपलब्ध असते याबद्दल पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
हि भेट यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, प्रा. सिद्धेश पवार आदींसह सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले