स्वेरीच्या तीन विद्यार्थ्यांची ‘जारो एज्युकेशन’ या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड मिळाले प्रत्येकी वार्षिक रु. ११ लाखांचे पॅकेज


 

स्वेरीच्या तीन विद्यार्थ्यांची ‘जारो एज्युकेशन’ या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड


मिळाले प्रत्येकी वार्षिक रु. ११ लाखांचे पॅकेज



पंढरपूरः‘जारो एज्युकेशन’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या निवड प्रक्रियेतून गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

   ‘जारो एज्युकेशन’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील अदिती विठ्ठल कुलकर्णी, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागातील दत्तात्रय सूर्यकांत आहेरवाडी व सिव्हील इंजिनिअरिंग या विभागातील सृष्टी धनाजीराव लेंडवे या तीन विद्यार्थ्याची निवड केली असून त्यांना प्रत्येकी वार्षिक रु. ११ लाख इतके पॅकेज मिळाले आहे. अशा नामवंत कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी दरवर्षी रुजू होत असतात, ही एक विशेष महत्वाची बाब आहे. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंटसाठी येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. या विद्यार्थ्यांना स्वेरीमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट मधील व त्यांच्या विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी ‘जारो एज्युकेशन’ या कंपनीत निवड झालेल्या तिन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.