कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सिंहगडचा दबदबा* सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांची इका केमिकल्समध्ये निवड *वार्षिक ४ लाखांच्या पॅकेजवर मिळाली नोकरी*

 🏆 *कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सिंहगडचा दबदबा*


सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांची इका केमिकल्समध्ये निवड


*वार्षिक ४ लाखांच्या पॅकेजवर मिळाली नोकरी*




पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (ता. पंढरपूर) येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील दहा विद्यार्थ्यांची पुणेस्थित इका केमिकल्स या नामांकित कंपनीत कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे. निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वार्षिक चार लाख रुपयांचे वेतन पॅकेज मिळणार असल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार यांनी दिली.


निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनुप बालाजी नाईकल (पंढरपूर), साहिल संतोष घाळके (कोर्टी), राज विकास काटवटे (उस्मानाबाद), तुषार संजय पवार (पंढरपूर), आसावरी भगवानराव महाडिक (कोळेगाव), साक्षी आबासो बनसोडे (मंगळवेढा), तेजस्वी यशवंत खांडेकर (कलढोण), ज्ञानेश्वरी महेश खरात (पंढरपूर), प्रसाद पंडित डोके (पंढरपूर) तसेच अभिषेक चंद्रकांत देवरे (पापरी, ता. मोहोळ) यांचा समावेश आहे.


इका केमिकल्स ही बांधकाम क्षेत्रासाठी उच्च दर्जाची व टिकाऊ रासायनिक उत्पादने विकसित करणारी पुणेस्थित अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीतील निवडीमुळे विद्यार्थ्यांना करिअरची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.


महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर हे यश संपादन केल्याचे सांगितले. ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. समीर कटेकर यांनी सांगितले की, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्त्व विकासावर महाविद्यालय विशेष भर देत असून, त्याचाच परिणाम म्हणून विद्यार्थ्यांची सातत्याने नामांकित कंपन्यांमध्ये निवड होत आहे.


या यशाबद्दल उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ. अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडुरु, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अमोल कांबळे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.