पंढरपूर सिंहगड मध्ये पीसीबी डिझाईन या विषयावर कार्यशाळा*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये पीसीबी डिझाईन या विषयावर कार्यशाळा*



पंढरपूर: प्रतिनिधी 


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रिंटेड सर्किट बोर्डाचे वर्कशॉप आयोजित करण्यात येणार आले होते. हे वर्कशॉप मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.

   इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्कशॉप चे प्रास्ताविक करताना डाॅ. अल्ताफ मुलाणी म्हणाले, विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात अनेक स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना नवनवीन कल्पनेतून बुद्धीला चालना मिळण्याची संधी प्राप्त होत असते असे मत डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी या दरम्यान बोलताना व्यक्त केले.

  या वर्कशॉप मध्ये प्रा. गणेश लिंगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या वर्कशॉप मध्ये ८० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. 

  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अविनाश हराळे, प्रा. अनिता शिंदे, प्रा. राहुल घोडके, अमित करांडे आदींसह सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad