*पंढरपूर सिंहगडच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये गेट परीक्षा विषयावर व्याख्यान संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी पंढरपूर मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागात दिनांक १९ ऑक्टोबर २०२३ रोजी गेट परीक्षा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. सतीश आवारे यांनी गेट परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. सतीश आवारे हे २०१६पासून ते २०२३ पर्यंत प्रत्येक वर्षी गेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात गेट परीक्षा खूप महत्त्वाची मानली जाते. तसेच ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याचे विद्यार्थ्यांना खूप फायदेही असतात. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आयआयटी, एनआयटी सारख्या महाविद्यालयात उच्च शिक्षण घेऊ शकतात तसेच इतर क्षेत्रात ही खूप संधी आहेत.
या व्याख्यानात विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी कशी करावी, अभ्यास कसा करावा यासारख्या अनेक गोष्टीवर मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शक सतीश आवारे यांचे स्वागत विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांच्याकडून करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक प्रा.सुजित राठोड होते. कार्यक्रमात अंतिम वर्षातील आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
हा कार्यक्रम सेसाच्या अंतर्गत पार पाडण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.