पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात पालक मेळावा उत्साहात*

पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात पालक मेळावा उत्साहात...



पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात १४ ऑक्टोबर २०२३ रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

    इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्याचे उद्घाटन विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, पालक प्रतिनिधी महेश कुलकर्णी, प्रा. अंजली चांदणे, प्रा. अविनाश हराळे, प्रा. अनिता शिंदे आदीच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

   महाविद्यालयाच्या वतीने पालक प्रतिनिधी महेश कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी उपस्थित पालकांसमोर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आढावा मांडला. 

   यादरम्यान उपस्थित अनेक पालकांनी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीबद्दल कौतुक केले.

 या पालक मेळाव्यात इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच नामांकित कंपनीत निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

   हा मेळाव्याचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अनिता शिंदे यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad