पंढरपूर सिंहगडच्या २ विद्यार्थ्यांची "ट्रान्स डिजिटल कन्सल्टिंग प्रा. लि." कंपनीत निवड*

 *पंढरपूर सिंहगडच्या २ विद्यार्थ्यांची "ट्रान्स डिजिटल कन्सल्टिंग प्रा. लि." कंपनीत निवड*



पंढरपूर: प्रतिनिधी 


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये चतुर्थ वर्षात काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असलेले पाचेगाव खुर्द (ता. सांगोला) येथील अभिजित भारत नलवडे आणि विटे (ता.पंढरपूर) येथील रोहित बाळू कोळी या दोन विद्यार्थ्यांची "ट्रान्स डिजिटल कन्सल्टिंग प्रा. लि." कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांनी दिली.

  एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची "ट्रान्स डिजिटल कन्सल्टिंग प्रा. लि." हि कंपनी एक प्रॉडक्ट बेस बहुराष्ट्रीय नामांकित कंपनी आहे. या कंपनीचे कार्यालये हि भारतातील चेन्नई, हैद्राबाद आणि बंगलोर आदी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. हि कंपनी क्लाऊड, डेटा, सेक्युरीटी आदी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. अशा या कंपनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील २ विद्यार्थ्यांची "ट्रान्स डिजिटल कन्सल्टिंग प्रा. लि." निवड झाली असुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ४.२५ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.

   "ट्रान्स डिजिटल कन्सल्टिंग प्रा. लि." कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad