स्वेरीमध्ये ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ संपन्न
तज्ञांनी दिला सहयोगात्मक संशोधन प्रकल्पांवर भर
पंढरपूर- तंत्रज्ञानाबाबत खुल्या व्यासपीठावर चर्चा करून व परस्पर सहयोगावर आधारित संशोधन प्रकल्पांच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाच्या विकासाला गती देण्यासाठी प्राध्यापकांचे ज्ञान अद्ययावत असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात दि.१७ जुलै २०२३ ते २२ जुलै २०२३ या कालावधी दरम्यान ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’चे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने झालेल्या या उपक्रमात अनेक तज्ञ संशोधक व मार्गदर्शक सहभागी झाले होते.
या उपक्रमात ऑनलाईन पद्धतीने सिल्चर (आसाम) येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील डॉ.आशिष परमाने, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आय.आय.टी.), मुंबई येथील डॉ.विजय मंडाल, सोलापूर येथील वालचंद इन्स्टिटयूटचे प्रा. व्ही.पी. कुलकर्णी, आंध्रप्रदेशातील जी.एम.आर. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे डॉ.बाप्पा मोंडल, पुणे येथील डॉ.ललित पाटील, तामिळनाडू येथील डॉ. दिव्या जिंदानी, पश्चिम बंगाल मधील डॉ. चिरंजीब भौमिक, किर्लोस्कर इन्स्टिटयूट ऑफ अॅडवान्सड मॅनेंजमेंट स्टडीज्, पुणे येथील डॉ. दिग्विजय सिंग या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी संशोधन व विकासाला गती देण्याच्या दृष्टीने परस्पर सहयोगी प्रकल्प, संसाधने आणि कौशल्ये या विविध विषयांवर बहुमोल मार्गदर्शन केले. कांही तज्ञांनी या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होवून मार्गदर्शन केले. ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने संपन्न झालेल्या या उपक्रमात जवळपास ३५० संशोधक व प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. संशोधकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी वाजवी पेटंट प्रणालीच्या महत्त्वावरही या उपक्रमात भर देण्यात आला. बौद्धिक संपदा, बौद्धिक हक्कांचे संरक्षण आणि ज्ञान प्रसार यांच्यात योग्य संतुलन राखणे महत्त्वपूर्ण मानले जाते. तंत्रज्ञानातून नवनिर्मितीला जसजसा वेग मिळतो तसतसे त्या नवनिर्मिती च्या माध्यमातून मानवी कल्याण व्हावे हे अपेक्षित असते. त्या दृष्टीने विविध विषयांवर या उपक्रमात सखोल चर्चा झाली. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.श्रीकृष्ण भोसले, संशोधन अधिष्ठाता डॉ. अमरजित केने, समन्वयक डॉ.नितिन कऊटकर यांच्यासह इतर प्राध्यापकांनी हा ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.