*पंढरपूर सिंहगडला सोलापूर विद्यापीठाचे ३ पुरस्कार*
○ उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट काॅलेज अन् उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्राप्त
पंढरपूर: प्रतिनिधी
अल्पावधितच पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूट ने शैक्षणिक क्षेत्रात दबदबा निर्माण करून नावलौकिक संपादित केला आहे. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड इन्स्टिटय़ूट पंढरपूर मध्ये एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालय असुन या महाविद्यालयाला उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट महाविद्यालय अन् उत्कृष्ट शैक्षणिक संस्था असे पुरस्कार देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून गौरविण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त सन २०१७-२०१८ मध्ये पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मध्ये कार्यरत असलेले प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांना गौरविण्यात आले. सन २०२२-२३ या वर्षी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयाला "उत्कृष्ट महाविद्यालय" आणि सन २०२३-२४ या या वर्षी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला "उत्कृष्ट शैक्षणिक संस्था" म्हणून गौरविण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. अनेक क्षेत्रातील करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. विविध संधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य व गुणात्मक दर्जा वाढतो त्यामुळे विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान प्राप्त होते. त्यामधून अनेक विद्यार्थी नामांकित कंपनीत निवडलेले जात आहेत.अल्पावधीतच पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजने उत्कृष्ट निकाल व उत्कृष्ट प्लेसमेंट देऊन गुणवत्ता सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांना पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधुन नामांकित कंपनीत नोकऱ्या भेटत असल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून आनंद व समाधान व्यक्त होत आहे