सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचा 31 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
पुणे/ प्रतिनिधी
पुणे दि.१२ : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, पुणे या संस्थेची स्थापना प्रो. एम. एन. नवले सर (संस्थापक अध्यक्ष) यांनी 12 ऑगस्ट 1993 रोजी केली. आज तागायत संस्थेचे एकूण 85 महाविद्यालय व 26 शाळा पुणे, मुंबई, सोलापूर येथे ज्ञानदानाचे काम करत आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था उत्तम कार्य करत आहे. आज या संस्थेचा 31 वा वर्धापन दिन उत्साहात एस.टी.ई.एस. लोणावळा संकुल येथे विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. या उपक्रमात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण ,विविध स्पर्धा - ट्राय कलर रेसिपी स्पर्धा, पेंटिंग स्पर्धा ,स्केचिंग स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,रेन मॅरेथॉन ,किस्से कॅम्पसके स्पर्धा , फोटोग्राफी स्पर्धा व वृक्षारोपण यासारखे विविध उपक्रम साजरे करून करण्यात आला. यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध स्पर्धांच्या निरीक्षण विविध निरीक्षक यांनी केले व विजेत्यांना विविध बक्षिसे , प्रमाणपत्रे देण्यात आली. या विविध उपक्रमांचे उद्घाटन संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड,श्री.विशाल विकारी लोकमत वार्ताहर व विविध विद्यालयांचे प्राचार्य , संचालक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संकुलातील सर्व विद्यालयांचे प्राचार्य, संचालक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, एन एन एस चे सर्व प्रोग्राम ऑफिसर व एन एन एस चे स्वयंसेवक हे बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रो.एम. एन. नवले सर ,सचिव डॉ.(सौ.) सुनंदा नवले मॅडम, उपाध्यक्ष डॉ. रोहित एम. नवले सर, उपाध्यक्षा डॉ. रचना नवले- अष्टेकर मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क संपादक -गणेश गांडुळे मो ७९७२५९९५५०