राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी अजित पाटील यांची नियुक्ती जाहीर*

 *राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी अजित पाटील यांची नियुक्ती जाहीर*



*जत/प्रतिनिधी :

   राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी जत तालुक्याचे सुपुत्र अजित पाटील यांची निवड प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी पत्राद्वारे जाहीर केली.

     जत तालुक्याचे सुपुत्र असणारे अजित पाटील यांच्याकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे निष्ठावंत शिलेदार म्हणून पाहिलं जातं, एक पक्ष, एक नेता, एक झेंडा या विचारधारेवरती चांगल्या वाईट काळात सुद्धा काम करणारा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. विद्यार्थी दशे पासून राष्ट्रीय समाज पक्षाची कास धरून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांचे नेतृत्व स्वीकारून त्यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या मध्ये पोहोचवण्याचं काम ते अहोरात्र करत असतात. राष्ट्रीय समाज पक्षाच्या विद्यार्थी आघाडीच्या जत शहराध्यक्ष पदापासून विद्यार्थ्यां आघाडी जत तालुकाध्यक्ष, युवक आघाडी जत तालुकाध्यक्ष, युवक आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष, सांगली जिल्हाध्यक्ष, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख, पश्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष आदी पक्षाच्या पदावर काम केले असून त्यांना आता राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सरचिटणीस पदी काम करण्याची संधी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी दिली आहे. यांच्या माध्यमातून जत सारख्या दुष्काळी भागातील एका युवक नेतृत्वाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करण्याची संधी मिळाली असल्याने सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

   महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता विरोधात लढण्याची मानसिकता सध्या कोणाचीच नाही. अशा परिस्थितीमध्ये जनतेचा आवाज म्हणून जनतेचे प्रश्न घेऊन लढण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहेच. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक महादेव जानकारांचे निवडीनंतर मुंबई प्रदेश कार्यालयात भेट घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय संघटक, प्रदेशाध्यक्ष व महासचिव यांनी मला राज्याच्या सरचिटणीस पदी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल या सर्वांचे आभार. पक्षाने राज्याचा सरचिटणीस म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी दिली असली तरी पक्षीय संघटना मजबूत ठेवायचे असेल तर पक्षाकडे नवीन युवक व विद्यार्थी जोडला गेला पाहिजे. ही काळाची गरज आहे. तसेच आताच्या काळात सोशल मीडिया देखील तितकीच महत्त्वाची आहे. यासाठी या गोष्टी मजबुतीने उभारण्याकरिता सर्वांच्या साथीने ताकदीने काम करणार तसेच राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचा ५७ वा वाढदिवस आला असून, या निमित्याने दरवर्षी प्रमाणे पक्षाचा निधी संकलन सोहळा प्रत्येक तालुक्यामध्ये संपन्न व्हावा यासाठी कामाला लागणार असल्याचे निवडीनंतर नूतन प्रदेश सरचिटणीस अजित पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad