सौ. स्वाती श्रीमंत दांडगे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार, महिला दिनाची ग्रामीण भागातील महिला सरपंच यांना अनोखी भेट
पंढरपूर / प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील रांजणी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. स्वाती श्रीमंत दांडगे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार महिला दिनाच्या निमित्ताने देण्यात आला.स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे अशी माहिती या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे पाटील, व प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार यांनी दिली आहे.
रांजणीच्या सरपंच सौ स्वाती दांडगे यांनी निवडीपासून एक वर्षाच्या कालावधीत गावात केलेला विकास कामांचा चढता आलेख पाहता त्याचं कौतुक होताना दिसून येत आहे.गावातील रस्ते, पाणी, वीज याच बरोबर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल आणि गावातील नागरिकांना विहिर मंजूर करून देण्यासाठी केलेल्या कामांमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. तर उर्वरित लोकांना ही लवकर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊ असा विश्वास ही सरपंच दांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.
या सर्व विकास कामांची दखल घेत त्यांना महिला दिनाच्या निमित्ताने स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला.रविवार दिनांक ९ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता माऊली संकुल सभागृह अहिल्यानगर या ठिकाणी या पुरस्काराची वितरण करण्यात आले.स्वाती श्रीमंत दांडगे यांना आदर्श महिला सरपंच हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.