आमदार बबनदादा शिंदे यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी केला अभिजीत पाटील गटात प्रवेश* *अकोले बुद्रुक येथील असंख्य कार्यकर्त्यांनी केला अभिजीत पाटलांच्या गटांमध्ये जाहीर प्रवेश*

 माढ्यात बबनदादा गटाला घरघर


*आमदार बबनदादा शिंदे यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी केला अभिजीत पाटील गटात प्रवेश* 


*अकोले बुद्रुक येथील असंख्य कार्यकर्त्यांनी केला अभिजीत पाटलांच्या गटांमध्ये जाहीर प्रवेश*



प्रतिनिधी/- 


माढा विधानसभा मतदारसंघात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करत असल्याने त्यांना जनतेच्या मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. माढा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच अभिजीत पाटील यांनी मास्टर स्ट्रोक मारत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ३५०० प्रति टन ऊसाला दर देण्याचे घोषित केल्याने अभिजीत पाटलांना माढ्यामध्ये वाढता प्रतिसाद मिळत आहे त्याच अनुषंगाने अनेक वर्षांपासून माढा विधानसभा मतदारसंघात आपले वर्चस्व प्रस्थापित ठेवून असलेल्या विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटातून अकोले बुद्रुक येथील रामचंद्र साहेबराव नवले, ग्रामपंचायत सदस्य संतोष साहेबराव नवले, पोलीस पाटील भालचंद्र परबत, पांडुरंग सलगर, सुरेश कोरडे, तानाजी माने यांनी अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश केल्याने आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटाला घरघर लागल्याचे चित्र दिसून येत आहेत.


माढा विधानसभा मतदार संघात अभिजीत पाटील यांनी श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. याचबरोबर या विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे काम करत असल्याने मतदार संघातील अनेक कार्यकर्ते अभिजीत पाटील यांच्याकडे विकासाभिमुख चेहरा म्हणून आशेने पाहत असून त्यांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे.


यावेळी पांडुरंग सलगर, सुरेश कोरडे, नेताजी लांडे, साहेबराव नवले, हनुमंत नवले, शिवाजी लांडे, भारत माळी, राजेंद्र नवले, बाळासाहेब नवले, बापू मोरे, तानाजी नवले, हनुमंत नवले, लखन शिरतोडे, दीपक पवार, तानाजी माने यांसह श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक

सचिन पाटील, सिद्धेश्वर बंडगर, संजय पाटील, ऊस विकास अधिकारी वाघ साहेब आदी मान्यवर उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad