*पंढरपूर सिंहगड मध्ये "अॅडव्हान्स सर्वे बाय यूजिंग टोटल स्टेशन" या विषयावर कार्यशाळा*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये बुधवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी "अॅडव्हान्स सर्वे बाय यूजिंग टोटल स्टेशन" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात आयोजित केलेल्या कार्यशाळेत सुमीत किरते यांनी जमिन, रस्ते, बिल्डिंग यांचे डीपीआर याबाबत मार्गदर्शन केले. याशिवाय जमिनीचे क्षेञफळ काढणे, जमिनीचे चढ उतार काढून प्रोजेक्ट तयार करणे, धरण, रस्ते, कॅनाल इत्यादींचे इस्टिमेट कसे काढायचे याबाबत कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना सांगितले.
या कार्यशाळेत सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील द्वितीय वर्ष शिक्षण घेत असलेले ६० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. हे वर्कशॉप यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम, प्रा. चंद्रकांत देशमुख सह सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.