*आपले ध्येय निश्चित करा, यश नक्की मिळेल.. जगदीश दळवी*
*सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्रमचे उद्घाटन**
सोलापूर: केगांव येथील एन.बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्रमचे उद्घाटन, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय नवले सर यांच्या मार्गदर्शनाखाली, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सोलापूर मधील पहिल्या आंतराष्ट्रीय आयटी कंपनीचे संस्थापक श्री सुमित कुडाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महिला व बालकल्याण अधिकारी श्री जगदीश दळवी तसेच उत्कृष्ट मल्टिचीप डिझाईन इंजिनिअर नजमा निलेगम जहागीरदार यांच्या विशेष उपस्थितीत सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर नवले, ज्येष्ठ संशोधक व माजी कुलगुरू डॉ. एस.एच.पवार, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे, डॉ.विनोद खरात, डॉ. इम्रान चंदरकी यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी आपल्या मनोगतामध्ये कॉलेजची उद्दिष्टे, कॉलेजमध्ये राबवल्या जाणारे उपक्रम याबद्दल माहिती सांगितली व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले व इंडक्शन प्रोग्रॅमचा उद्देश सांगितला.
याप्रसंगी सुमित कुडाळ यांनी सोलापूरमध्ये पहिली आयटी कंपनी स्थापन कशी केली त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना मायक्रोमॅनेजमेंट स्किल कसे असावेत याबद्दल प्रेरित केले.
तसेच महाराष्ट्र सरकार वर्ग एक अधिकारी जगदीश दळवी यांनी विद्यार्थ्यांना कठीण परिश्रम करायची तयारी असेल तर कोणतंही अपयश तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही, यश मिळवण्यासाठी काही सुखांचा त्याग करावा लागतो, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर महाविद्यालयातील ईतर उपक्रमात जस जसे की प्रोजेक्ट एक्जीबिशन, कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला पाहिजे असे सांगितले. त्यांनी गेट आणि एमपीएससी परीक्षे विषयी मार्गदर्शन केले.
तसेच नजमा नीलेगम यांनी विद्यार्थ्यांना स्वअनुभवातून प्रेरीत केले, तसेच त्यांनी अभ्यासासोबत आवडीची कला जोपासावी असे सुद्धा सांगितले.
डॉ. एस.एच.पवार यांनी महाविद्यालयातील संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती संगितली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आयेशा अलीम व श्रीयांका पाटिल यांनी केले व आभारप्रदर्शन डॉ. इम्रान चंदरकी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा.एन. डी. खराडे, डॉ. सुवर्णा क्षीरसागर, प्रा.सविता कोंडा, प्रा.किरण पाटील,डॉ. अमित कांबळे, प्रा. नितीश पोतदार, प्रा.सचिन घाडगे, डॉ.प्रवीण भालेराव, प्रवीण शिंदे, विवेक ब्रह्मशेट्टी यांनी परिश्रम घेतले.