पंढरपूर सिंहगडच्या १२ विद्यार्थ्यांची "कॅपजेमिनी" कंपनीत निवड
पंढरपूर : प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या १२ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कॅपजेमिनी कंपनीत कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. अनेक क्षेत्रातील करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. विविध संधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य व गुणात्मक दर्जा वाढतो त्यामुळे विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान प्राप्त होते. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या मुलाखती मधून काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील प्रिया दिगंबर चांडोले, मुनीरा अझीम खान, सानिया शुकुर तांबोळी, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील आसावरी अनंत बोक्षे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील युवराज जगन्नाथ रणशिंगे, रणजीत महादेव राऊत, प्रतिक बलिराम माळी, सुरज संजय व्यवहारे, अशय राजेंद्र खटावकर, सलोनी शकील नदाफ, मयुरी आण्णासो बीले, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विनोद निवृत्ती सोलनकर आदी १२ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड करण्यात आली असुन कॅपजेमिनी कडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ४ लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
अल्पावधीतच पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजने उत्कृष्ट निकाल व उत्कृष्ट प्लेसमेंट देऊन गुणवत्ता सिद्ध केली असून महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळाला असुन उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त करणारे पंढरपुर सिंहगड हे पहिले इंजिनिअरींग काॅलेज ठरले आहे. विद्यार्थ्यांना पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधुन नामांकित कंपनीत नोकऱ्या भेटत असल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
कॅपजेमिनी कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे, दत्तात्रय कोरके, वैभव गोडसे, प्रा. अतुल कुलकर्णी, राजाराम राऊत आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.