स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सागर घाडगे यांची ‘अॅटलास कॉपको’ या कंपनीत निवड! मिळाले वार्षिक रु. ६.३६ लाखांचे पॅकेज!


स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सागर घाडगे यांची ‘अॅटलास कॉपको’ या कंपनीत निवड!

मिळाले वार्षिक रु. ६.३६ लाखांचे पॅकेज!



पंढरपूरः ‘अॅटलास कॉपको’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वीडीश कोअर कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सागर दादासाहेब घाडगे यांची कॅम्पस मधून निवड करण्यात आली असून त्यांना वार्षिक रु.६.३६ लाख इतके पॅकेज मिळाले आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

        मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या ‘अॅटलास कॉपको’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये कॅम्पस ड्राईव्ह चे आयोजन केले होते. या समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सागर दादासाहेब घाडगे या विद्यार्थ्याची निवड केली असून त्यांना वार्षिक रु.६.३६ लाख इतके पॅकेज मिळाले आहे. ‘अॅटलास कॉपको’ ही कंपनी स्वीडन मध्ये १८७३ साली स्थापन झाली असून ती इंडस्ट्रीयल टूल्स अँड अप्लायन्सेस या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. आज या कंपनीमध्ये ४९ हजार पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असून ही कंपनी सध्या १८० पेक्षा अधिक देशांमध्ये आपली सेवा देत आहे. २०२२ मध्ये या कंपनीने १३ बिलियन युरो पेक्षा अधिक रिव्हेन्यूचा टप्पा गाठला आहे. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. विद्यार्थ्यांना स्वेरी मध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, एडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव, ग्रुप डिस्कशन, सॉफ्टवेअर ट्रेनींग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर संधी मिळण्यासाठी जापनीज लैंग्वेज ट्रेनींग तसेच जीआरई, टोफेल या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. सदर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या सागर दादासाहेब घाडगे यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad