*पंढरपूर सिंहगडच्या दोन विद्यार्थ्यांची "पर्सिस्टंट सिस्टम्स" या कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
पर्सिस्टंट सिस्टम्स ही एक भारतीय बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीची स्थापना १६ मे १९९० रोजी करण्यात आली आहे. पर्सिस्टंट सिस्टम्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहेत. कंपनीचे शेअर्स मार्च २०१० मध्ये भारताच्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध झाले आहेत. अशा या कंपनीत एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात २ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज हे विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात उत्तम बनविण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांचे उज्ज्वल करिअर होण्यासाठी चांगल्या कंपनी प्लेसमेंट होणे आवश्यक असते. यासाठी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये प्लेसमेंट साठी आवश्यक असलेले गुण, प्लेसमेंटची संपुर्ण तयारी या सर्वच गोष्टी अभ्यासक्रमात सिंहगड कॉलेज मध्ये घेण्यात येतात. यामुळे प्लेसमेंट सामोरे जात असताना विद्यार्थी सर्व गुणसंपन्न तयार होतो. यातूनच विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत प्लेसमेंट होत आहे. सुरवाती पासून प्लेसमेंटची तयारी घेण्यात येत असल्याने विद्यार्थी आत्मविश्वासावर नामांकित कंपनीत निवडले जात आहेत. चालू शैक्षणिक वर्षांतील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेले कमलापुर (ता. सांगोला) येथील अभिजित अंकुश गोडसे व पाचेगाव (खुर्द) ता. सांगोला येथील अभिजित भारत नलवडे या दोन विद्यार्थ्यांची पर्सिस्टंट सिस्टम्स या कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून ५.१० लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
"पर्सिस्टंट सिस्टम्स" कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.